Gita Jayanti 2022:  कधी आहे गीता जयंती? याच दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली होती गीता!

| Updated on: Nov 19, 2022 | 4:59 PM

मोक्षदा एकादशीला दरवर्षी गीता जयंती साजरी करण्यात येते. या दिवसाचे काय महत्त्व आहे जाणून घेऊया

Gita Jayanti 2022:  कधी आहे गीता जयंती? याच दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली होती गीता!
श्रीकृष्ण
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, हिंदू धर्मात गीता जयंतीला (Geeta Jayanti 2022) विशेष महत्त्व आहे. गीता जयंती दरवर्षी मार्शीस शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. या दिवशी मोक्षदा एकादशी देखील साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने महाभारत (Mahabharta) युद्धापूर्वी अर्जुनला गीतेचा उपदेश केला, अशी धार्मिक मान्यता आहे. असे म्हटले जाते की, जे दररोज गीता पठण करतात आणि गीतेमध्ये दिलेल्या  उपदेशांचे पालन करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो. गीतेत सांगितलेल्या गोष्टी माणसाला भ्रमाच्या पाशातून काढून यशाच्या मार्गावर घेऊन जातात. चला जाणून घेऊया गीता जयंतीची तारीख, पूजा मुहूर्त आणि महत्त्व.

गीता जयंती 2022 तारीख

हिंदू पंचांगानुसार, गीता जयंती मार्शिश महिन्याच्या शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीला साजरी केली जाते. यावेळी 3 डिसेंबर 2022 रोजी गीता जयंती साजरी केली जाईल. श्रीमद भगवद् गीतेचा हा 5159 वा वर्धापन दिन असेल.

गीता जयंतीचे महत्त्व

गीतेमध्ये जीवनाचे संपूर्ण सार सांगितले आहे, ज्यामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या शिकवणींचा समावेश आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान देऊन ऐहिक आसक्तीतून मुक्त केले.  योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगितला.

हे सुद्धा वाचा

असे म्हणतात की रणांगणात अर्जुन समोरच्या नातेवाईकांना पाहून विचलित झाला आणि त्याने शस्त्र उचलण्यास नकार दिला, तेव्हा सारथी झालेल्या भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचे ज्ञानाचे डोळे उघडण्यासाठी गीतेचा उपदेश केला. त्यानंतर अर्जुनने पूर्ण ताकदीने युद्ध केले आणि कौरवांचा पराभव केला.

गीता माणसाच्या विचारात शुद्धी आणते, गीतेच्या शिकवणीत इतकी ताकद आहे की ती पाळणारा माणूस चांगल्या-वाईटातील फरक समजू शकतो. जीवन जगण्याची अद्भुत कला गीतेच्या श्लोकांत शिकवली आहे. या दिवशी गीता पठण केल्याने श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते.

गीता जयंती पूजा विधि

गीता जयंतीच्या दिवशी श्रीमद भगवद् गीतेची पूजा करावी. त्यानंतर गीतेचे पठण करावे. यानंतर, शक्य असल्यास, गीता ग्रंथ इतरांना दान करावे. तुम्ही अन्न, कपडे आणि पैसे देखील दान करू शकता. या दिवशी श्रीकृष्णाची देखील पूजा करावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)