आपल्या घरातील लहान मुलांमुळे घराला घरपण येतं असे म्हणतात. लहानमुलं त्यांच्या साधेपणामुळे आपल्या सगळ्यांना आकर्षित करतात. लहान वयामध्ये अनेक गोष्टी खूप लवकर शिकायला मिळतात. लहान वयात आपल्या मुलांवर योग्य आणि चांगले संस्कार व्हावेत अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. आपल्या मुलांचे भविष्य त्यांच्या लहानपणीच्या संगोपनावरून ठरवता येतं. भविष्यामध्ये आपल्या मुलांनी योग्य मार्गावर जावं असं सगळ्यांचं स्वप्न असते. मुलांच्या उज्वल भविष्यासाठी पालक त्यांच्यावर सुसंस्कृत संस्कार सुरुवाती पासूनच करत असतात.
तुमच्या मुलांना योग्य वळण लागण्यासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सूरुवाती पासूनच धार्मिक शिक्षण देणे अत्यंत गरजेचे असते. अशा अनेक आध्यात्मिक सवयी आहेत ज्यां तुमच्या मुलांना लहान असल्यापासून शिकवा. या सवयी तुमच्या लहान मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडतात आणि मुलं चांगल्या मार्गावर लागतात.
सर्वप्रथम तुमच्या मुलांना मोठ्यां विषयी कृतज्ञ होण्यास शिकवा. लहान मुलांना मोठ्यां विषयी प्रेम आणि आदर वाटणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लहानमुलांनी मोठ्यांशी आदराने आणि प्रेमामे बोलल्यामुळे त्यांच्या मनामध्ये लहानमुलांविषयी आदर वाटते त्यासोबतच त्यांच्या सोबत बोलल्यावर चांगले वाटते. तुमच्या मुलांना जर कोणत्या व्यक्तीने टॉफी, खेळणी किंवा एखादे भेटवस्तू दिले तर त्यांनी मोठ्यांना थँक्यू किंवा त्यांचे आभार मानले पाहिजेत. लहानमुलचे मन निष्पाप असते अशी मान्यता आहे. तुमच्या मुलांमधील निरागसपणा टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या मुलांच्या मनामध्ये दयाळूपणा निर्माण करा. मुलांना दयाळूपणाचे धडे शिकवल्यामुळे त्यांच्यामधील निरागसता टिकून राहाते. मुलांच्या मनामध्ये पशू-पक्ष्यांविषयी मदत भाव निर्माण करा. त्यासोबतच झाडे लावा आणि जगवा , त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये अशा गोष्टी शिकवा. अशा गोष्टींची शिकवण तुमच्या मुलांना दिल्यामुळे त्यांच्या मनातील सेवाभाव वाढतो.
आजकालच्या जगामध्ये चुकिच्या गोष्टी वाढल्या आहेत. चुकिच्या गोष्टी शिकण्यासाठी जास्त वेळ लागत नाही परंतु, चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी भरपूर वेळ लागतो. आजकालच्या मुलांना सतत मोबाईल वापरण्याची सवय असते. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतोच पण मुलांच्या मेंदूची वाढ देखील होत नाही. त्यासोबतच मोबाईलमुळे मुलांचे मानसिक आरोग्य बिघडते आणि मुलांमधील चिडचचिडेपणा वाढतो. तुमच्या मुलांना लहानपणी पासूनच मैदानी खेळ खेळायची सवय लावा यामुळे त्याचे आरोग्य निरोगी राहाचे त्यासोबतच मुलांच्या मेंदूची वाढ देखील निरोगी राहाते. त्यासोबतच तुमच्या मुलांना सकाळी लवकर उठल्यावर नियमित व्यायाम करावा आणि त्यानंतर मुलांचे अभ्यासामधील लक्ष केंद्रित होण्यास मदत होते.