Gudi Padwa 2021 | गुढी कशी उभारावी, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?

| Updated on: Apr 12, 2021 | 3:48 PM

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या तिथी गुढी पाडवा म्हणून साजरी केली जाते (Gudi Padwa 2021). यावेळी गुढी पाडव्याचा सण 13 एप्रिलला साजरा केला जाणार आहे.

Gudi Padwa 2021 | गुढी कशी उभारावी, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?
Gudi Pawda
Follow us on

मुंबई : चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेची तिथी गुढी पाडवा म्हणून साजरी केली जाते (Gudi Padwa 2021). यावेळी गुढी पाडव्याचा सण 13 एप्रिलला साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. भगवान ब्रह्मा आणि विष्णूची पूजा केली जाते. हिंदू धर्मात असे मानले जाते की चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. विशेषकरुन महाराष्ट्रात हिंदू नववर्ष हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पीक दिवस म्हणूनही साजरा केला जातो (Gudi Padwa 2021 Know The Importance And Muhurat)

यंदाच्या वर्षी गुढीपाडवा 13 एप्रिल, मंगळवारी साजरा करण्यात येणार आहे. याच दिवसापासून नवरात्रोत्साच्या पर्वालाही सुरुवात होणार आहे. गुढीपाडवा हे पर्व महाराष्ट्रासोबतच गोवा आणि केरळातही हा सण साजरा केला जातो. या भागांमध्ये हा दिवस ‘संवत्सर पडवो’ या नावानं ओळखला जातो. कर्नाटकमध्ये हा सण युगाडी पर्व या नावाने ओळखला जातो, तर आंध्रप्रदेश, तेलंगाणामध्ये हा दिवस उगाडी, काश्मीरमध्ये ‘नवरेह’, मणिपूरमध्ये सजिबू नोंगमा पानबा या नावानं ओळखला जातो.

गुढीपाडवा कसा साजरा केला जातो?

गुढीपाडवा खासकरुन महाराष्ट्रात साजरा केला जातो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात. हा सण मित्र, कुटुंबातील सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. याशिवाय, गोड भातही बनविला जातो. सूर्योदयाला भगवान ब्रह्माला या सर्व पदार्थांचं नैवेद्य दाखवलं जाते.

गुढीपाडव्याचे महत्त्व

पौराणिक कथांनुसार, प्रतिपदेच्या तिथीला भगवान ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती केली होती. या दिवशी भगवान ब्रह्माची विधीवत पूजा केली जाते. मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरात सुख-समृध्दी नांदते.

गुढीपाडव्याची तिथी आणि शुभ मुहूर्त

गुढीपाडव्याचा उत्सव – 13 एप्रिल 2021

प्रतिपदा तिथीची सुरुवात – 12 एप्रिल 2021 ला रात्री 8 वाजता

गुढी कशी उभारावी –

गुढीची उंच काठी बांबूपासून तयार केली जाते. काठीला स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या
भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात.

काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा,
पितळ, किंवा चांदीचे गडू, तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते.

ज्या भागाला गुढी उभारायची आहे, तिथली जागा स्वच्छ करुन धुऊन पुसून घ्यावी.

त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवावी.

तयार केली गुढी दारात, उंच गच्चीवर, गॅलरीत लावावी.

गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करावी.

निरंजन लावून उदबत्ती ओवाळावी.

दूध साखर पेढ्यांचा नैवेद्य दाखवावं.

दुपारी गुढीला गोडधोडाचे नैवेद्य दाखवावे.

संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी परत हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाहून गुढी उतरवावी.

Gudi Padwa 2021 Know The Importance And Muhurat

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

स्वयंपाक करताना आणि जेवताना ‘या’ चुका करु नका!

Saptarshi | सप्तर्षी म्हणजे काय, ते किती प्रकारचे असतात? जाणून घ्या…