Gupta Navratri 2023: माघ गुप्त नवरात्रीला आजपासून सुरूवात, मुहूर्त आणि पुजा विधी

| Updated on: Jan 22, 2023 | 8:24 AM

पौराणिक काळापासून लोकांची गुप्त नवरात्रीवर श्रद्धा आहे. जीवन तणावमुक्त राहावे म्हणून गुप्त नवरात्रीमध्ये शक्तीची पूजा केली जाते.

Gupta Navratri 2023: माघ गुप्त नवरात्रीला आजपासून सुरूवात, मुहूर्त आणि पुजा विधी
गुप्त नवरात्री
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  आजपासून पासून म्हणजेच 22 जानेवारी 2023  गुप्त नवरात्र (Gupta navratri 2023) सुरू होत आहे आणि 30 जानेवारीला संपेल. यावेळी सिद्धी योगात गुप्त नवरात्रीची सुरुवात होत आहे. त्यामुळे यावेळच्या गुप्त नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. गुप्त नवरात्री वर्षातून दोनदा येते – माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आणि आषाढ महिन्याची शुक्ल पक्ष. गुप्त नवरात्रीचे हे व्रत मनोकामना पूर्ण करण्यासाठी पाळले जातात. गुप्त नवरात्रीमध्ये देवीच्या 10 महा विद्यांचे पूजन केले जाते. मान्यतेनुसार, 10 महाविद्या ही 10 दहा दिशांची अधिकृत शक्ती आहे. या नवरात्रीमध्ये तुम्ही तुमची पूजा-अर्चा गुप्त ठेवावी.

गुप्त नवरात्रीचे व्रत थोडे कठीण मानले जाते. यासोबतच मातेच्या मंत्रांचा जप केला जातो. गुप्त नवरात्रीमध्ये 10 विद्या माता काली, तारा देवी, त्रिपुरा सुंदरी, माँ भुवनेश्वरी, माँ चिन्नमस्ता, त्रिपुरा भैरवी, माँ ध्रुमावती, मां बांगलामुखी, माता मातंगी यांची पूजा केली जाते.

गुप्त नवरात्री 2023 शुभ मुहूर्त

माघ गुप्त नवरात्रीला 22 जानेवारी 2023 पासून म्हणजेच रविवारपासून सुरुवात होत आहे. प्रतिपदा तिथी पहाटे 02:22 पासून सुरू झाली असून ती रात्री 10:27 ला समाप्त होईल.

हे सुद्धा वाचा

घटस्थापना मुहूर्त – सकाळी 09.59 ते 10.46 पर्यंत

गुप्त नवरात्रीला या मंत्रांचा जप करा

पौराणिक काळापासून लोकांची गुप्त नवरात्रीवर श्रद्धा आहे. जीवन तणावमुक्त राहावे म्हणून गुप्त नवरात्रीमध्ये शक्तीची पूजा केली जाते. असे मानले जाते की यावेळी माता शक्तीच्या विशेष मंत्रांचा जप केल्याने कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळू शकते किंवा कोणतीही सिद्धी प्राप्त होऊ शकते.

ओम हरी क्लीन चामुंडयै विचाराय, ओम क्लीण सर्वबाधा विनिर्मुक्तो धन्य धन्य सुतन्यावितम्, मानवो मत प्रसादेन भविष्यति न संचयः क्लीन ओम, ओम श्री हरी हसौ: हूं फट नीलसरस्वत्ये स्वाहा इत्यादी विशेष मंत्रांचा जप केला जाऊ शकतो. गुप्त नवरात्रीच्या दिवशी माँ दुर्गेच्या अर्गल स्तोत्राचे पठण करावे. अर्गला स्तोत्राचे पठण केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच दुर्गा चालिसाचेही पठण करावे. गुप्त नवरात्रीमध्ये उपासना केल्याने भक्ताला रोग आणि शत्रूपासून मुक्ती मिळते.

गुप्त नवरात्रीचे खास उपाय

  1.  घरात कोणी आजारी असल्यास  दुर्गा देवीला लाल फुले अर्पण करावीत.
  2.  गुप्त नवरात्रीच्या वेळी घरात सोन्या-चांदीची नाणी जरूर आणा. असे मानले जाते की, असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात धन-समृद्धी वाढते.
  3.  ज्या लोकांची आर्थिक स्थिती ठीक नाही, त्यांनी गुप्त नवरात्रीमध्ये 9 दिवस माँ दुर्गाला सुगंधी उदबत्तीने ओवाळावे.
  4. गुप्त नवरात्रीमध्ये घरात मोराची पिसे आणणे शुभ मानले जाते.

गुप्त नवरात्रीला या गोष्टी करू नका

  1.  या दिवशी केस आणि नखे कापू नयेत.
  2.  या दिवशी सात्विक आहार घ्यावा. या दिवशी चुकूनही तामसिक आहार घेऊ नका.
  3.  या दिवशी ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक आहे.
  4.  गुप्त नवरात्रीमध्ये चामड्याची कोणतीही वस्तू वापरू नये.

गुप्त नवरात्री पूजन विधी

चैत्र आणि शारदीय नवरात्रात ज्या प्रकारे घटस्थापना केली जाते त्याच प्रकारे गुप्त नवरात्रात केली जाते. या नऊ दिवसांत सकाळ-संध्याकाळ माँ दुर्गेची आराधना केली जाते, त्यासोबत लवंग आणि बताशेही अर्पण करावे लागतात. यासोबतच देवीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करा. या दरम्यान दुर्गा सप्तशती पाठ करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)