मुंबई : शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती (Guru Nanak Jayanti 2023) कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यावर्षी गुरु नानक यांची जयंती 27 नोव्हेंबर रोजी आहे. लोक हा पवित्र दिवस प्रकाश उत्सव आणि गुरु पर्व म्हणून साजरा करतात. शीख धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हा दिवस खूप खास आहे. या दिवशी गुरुद्वारांमध्ये कीर्तन केले जाते आणि गुरुवाणीचे पठण केले जाते. तसेच ठिकठिकाणी लंगरचे आयोजन केले जाते. गुरु नानक देव लहानपणापासूनच धार्मिक स्वभावाचे होते. त्यांनी आपले जीवन मानव समाजाच्या कल्याणासाठी वाहून घेतले. आजही लोक त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतात. अशा परिस्थितीत गुरु नानक जयंतीनिमित्त जाणून घेऊया गुरू नानक यांचे अनमोल विचार.
जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे
गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु,
गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन
गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक
यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
‘कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही,
सर्व जण मानव आहोत’,
असा संदेश देणारे गुरु नानक देव
यांच्या जयंतीच्या सर्व शीख बांधवाना हार्दिक शुभेच्छा!
शीख बांधवांचे आद्य गुरु, गुरु नानक
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
जगातील सर्व मानव समान आहेत
असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक
गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !
शीख बांधवांचे गुरु,
गुरु नानक यांच्या जयंती निमित्त
सर्व शीख बांधवाना खूप खूप शुभेच्छा !
हे जग जिंकायचे असेल, तर स्वतःच्या कमतरतेवर,
दुर्गुणांवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे.
असा ज्ञान देणारे शीख बांधवांचे आद्य गुरु,
गुरु नानक जयंती निमित्त शुभेच्छा !
देव एक आहे. नेहमी एकच देवाची उपासना करा, देव सर्वत्र आणि प्रत्येक जीवात विराजमान आहे. जे देवाची उपासना करतात त्यांना कोणाचेही भय नसते.- गुरु नानक देव जी
प्रत्येक मानवाने एकमेकांना प्रेम, एकात्मता आणि बंधुत्वाचा संदेश दिला पाहिजे. पापाने मन अशुद्ध झाले तर भगवंताचे नाम घ्या, मन शुद्ध होईल.- गुरु नानक देव जी
एखाद्याने सत्य आणि कठोर परिश्रमाने गरीब आणि गरजूंना मदत करत रहावे. – गुरु नानक देव जी
माणसाने नेहमी तणावमुक्त राहावे, आपले काम चालू ठेवावे आणि नेहमी आनंदी राहावे. -गुरु नानक देवी जी