Guru Pradosh Vrat : या तारखेला आहे गुरू प्रदोष व्रत, भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठा अशा प्रकारे करा पूजा

| Updated on: Jun 13, 2023 | 11:18 AM

फक्त जलाभिषेकानेसुद्धा भगवान शिव प्रसन्न होऊन त्यांच्या भक्तांचे दुःख दुर करतात. शनी आणि राहू-केतूचे दुष्परिणामही त्यांच्या भक्तांवर होत नाहीत.

Guru Pradosh Vrat : या तारखेला आहे गुरू प्रदोष व्रत, भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठा अशा प्रकारे करा पूजा
गुरू प्रदोष व्रत
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात महादेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. कलियुगात भगवान शिव हे भक्तांवर अति शिघ्र प्रसन्न देवता आहेत असे मानले जाते.  त्यांच्या पूजेसाठी कोणत्याही विशेष नियमांची आवश्यकता नाही. फक्त जलाभिषेकानेसुद्धा भगवान शिव प्रसन्न होऊन त्यांच्या भक्तांचे दुःख दुर करतात. शनी आणि राहू-केतूचे दुष्परिणामही त्यांच्या भक्तांवर होत नाहीत. या कारणास्तव, प्रदोष व्रताला धार्मिक ग्रंथांमध्ये खूप महत्त्व दिले गेले आहे. जून महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत 15 तारखेला आहे. हे व्रत गुरूवारी देखील पाळले जात असल्याने याला गुरु प्रदोष व्रत (Guru Pradosh Vrat) म्हणतात.

प्रदोष व्रताचे महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा केल्याने भक्तांना इच्छित फळ मिळते. या दिवशी जे भक्त भोलेनाथाची पूजा करतात त्यांच्यावर भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांचे सर्व अडथळे दूर करतात. या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने कुटुंबात सुख-शांती नांदते असे मानले जाते.

अशा प्रकारे पूजा करा

प्रदोष काळ भगवान शिवाची पूजा करण्यासाठी खूप शुभ मानले जाते. अशा स्थितीत प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत करावे. त्यानंतर दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करावे. संध्याकाळी पुन्हा स्नान करून प्रदोष काळात शिवपूजा सुरू करावी. भगवान शंकराला पंचामृत आणि पाण्याने स्नान घाला आणि त्यांच्यावर बेलपत्र, धतुरा, भांग, रुद्राक्ष, गंगाजल आणि भांग अर्पण करा. त्यानंतर दिवा लावून त्यांची आरती करावी. या पद्धतीने भक्तिभावाने पूजा केल्याने महादेव प्रसन्न होतात.

हे सुद्धा वाचा

या चुका अवश्य टाळा

प्रदोष व्रताच्या दिवशी घरी तामसिक अन्न तयार करू नये. तसेच मांस-मद्य इत्यादीपासून दूर राहावे. सकाळी उशिरापर्यंत झोपू नये आणि अंघोळ केल्याशिवाय बाबा भोळे यांच्या चित्राला हात लावू नये. या दिवशी काळे कपडे अजिबात परिधान करू नयेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)