पौराणिक कथेनुसार ऋषी पराशर आणि देवी सत्यवती यांचे पुत्र महर्षी वेद व्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता. म्हणूनच दरवर्षी हा दिवस महर्षी वेद व्यास यांची जयंती (Vyas jayanti 2022) म्हणजेच गुरुपौर्णिमेचा सण (Guru purnima 2022) म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 2022 मध्ये गुरुपौर्णिमा 13 जुलै रोजी येत आहे. असे मानले जाते की वेद व्यासांनी वेदांचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेगवेगळ्या वर्गांमध्ये वर्गीकरण केले. या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 13 जुलैला ग्रहांचा विशेष योग्य जुळून येत असल्याने या तिथीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी हंस, षष्ठ, भद्रा आणि रुचक असे चार विशेष योग तयार होत आहेत. त्याचबरोबर बुध ग्रहामुळे बुधादित्य योग (Budhatitya yog) तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु मंत्र आणि दीक्षा घेतल्याने व्यक्तीला जीवनात प्रगती आणि समृद्धी मिळते. चला तर मग जाणून घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रहांच्या विशेष संयोगात कोणत्या गोष्टींचे दान करणे फलदायी ठरेल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)