Guruvar Vrat Vidhi: हिंदू धर्मात उपासनेला विशेष महत्त्व दिले जाते. प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देव किंवा देवीच्या पूजेसाठी समर्पित आहे. गुरुवार हा भगवान विष्णू (Vishnu worship) आणि बृहस्पति पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. पूजेसोबतच गुरुवारचे व्रत देखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि केळीच्या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी पूजा आणि व्रत केल्यास कुंडलीत गुरूचे स्थान बळकट होते अशी मान्यता आहे. शास्त्रानुसार गुरु हा अध्यात्म, यश आणि समृद्धीचा कारक मानला जातो. असे म्हटले जाते की गुरुवारी व्रत केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. जर तुम्हाला गुरुवारी उपवास करायचा असेल तर त्याची पूजा पद्धत जाणून घेणेही गरजेचे आहे. गुरुवारच्या व्रताची पद्धत जाणून घेऊया.
गुरुवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ पिवळे कपडे परिधान करावे. त्यानंतर भगवंताचे चिंतन करून व्रताचा संकल्प करावा.
बृहस्पतिसमोर किंवा केळीच्या झाडात शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर देवाला चंदनाचे तिलक चालावे. सुगंधित उदबत्ती ओवाळावी. हरभरा डाळ, पिवळी फुले आणि गूळ अर्पण करावे. या दिवशी तुम्ही प्रसादात बेसन लाडूही बनवू शकता.
हातात थोडी हरभरा डाळ आणि फुले घेऊन गुरुवारच्या व्रताची कथा वाचा. कथा संपल्यानंतर आरती करावी. त्यानंतर दिवसभर उपवास करावा. या दिवशी पिवळे कपडे, पिवळी फळे आणि पिवळे अन्न याला प्राधान्य द्यावे.
संध्याकाळी पुन्हा पूजा करा. या दिवशी मीठ न खाता उपवास केल्यास अधिक फळ मिळते. या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते, त्यामुळे केळीचे सेवन करू नये. गुरुवारच्या दिवशी केळी दान . याव्यतिरिक्त, तुम्ही गुरुवारी घरात साबण वापरू नका आणि केस धुवू नका.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)