मुंबई : हिंदू धर्माशी संबंधित मान्यतेनुसार, आठवड्याचे सात दिवस हे एका किंवा दुसर्या देवता किंवा ग्रहाच्या उपासनेसाठी समर्पित आहेत. गुरुवार (Guruwar Upay) हा दिवस जगाचे रक्षणकर्ते भगवान श्री विष्णूच्या पूजेसाठी हा दिवस अतिशय शुभ आणि फलदायी मानला जातो. आठवड्यातील या दिवसाचे नाव गुरु ग्रहाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हिंदू मान्यतेनुसार, गुरुवारच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि भगवान बृहस्पतिची पूजा केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात. चला जाणून घेऊया गुरुवारीचे सोपे आणि प्रभावी उपाय.
हिंदू मान्यतेनुसार भगवान श्री विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी व्यक्तीने प्रत्येक गुरुवारी व्रत करावे. असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्याने साधकाला श्री हरीचा आशीर्वाद लाभतो. बृहस्पति त्याच्या पत्रिकेत शुभ फल देऊन सुख आणि सौभाग्य प्रदान करतो.
हिंदू मान्यतेनुसार, भगवान श्री विष्णूला पिवळा रंग आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी आवडतात. अशा स्थितीत श्री हरीची पूजा करताना त्यांना हळदीचा तिळा लावावा आणि नैवेद्य म्हणून केळी किंवा आंबा अर्पण करावा. शुभफल प्राप्त होण्यासाठी तुम्ही श्रीहरीला फळ आणि केशरापासून बनवलेली मिठाई देखील अर्पण करू शकता.
जर तुम्हाला भगवान श्री विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचा आशीर्वाद हवा असेल तर तुम्ही या दोन देवतांची पूजा करताना त्यांच्या मंत्राचा जप केला पाहिजे. जर तुम्ही भगवान विष्णूची पूजा करत असाल तर तुम्ही ‘ओम नमो: नारायणाय नमः’ किंवा ‘ओम नमो: भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. जर तुम्ही देवगुरु बृहस्पतीची उपासना करत असाल तर ‘ओम ग्रं ग्रं ग्रौं सह गुरुवे नमः’ किंवा ‘ओम ब्रिम बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा.
हिंदू मान्यतेनुसार गुरुवारी शुभ मानला जाणारा हळदीचा उपाय कोणत्याही व्यक्तीचे नशिब उजळवू शकतो. अशा स्थितीत गुरूवारी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करताना पाण्यात चिमूटभर हळद मिसळून आंघोळ करावी आणि त्यानंतर काही पाण्यात हळद विरघळवून ती घराबाहेर शिंपडावी. घराचा मुख्य दरवाजा आणि घराच्या सर्व कोपऱ्यात हळदीचे पाणी शिंपडावे.