Hanuman Jayanti 2023 : या दोनशे वर्ष जुन्या हनुमान मंदिरात पुर्ण होतो प्रत्त्येकाचा नवस, कुठे आहे हे मंदिर?

| Updated on: Apr 06, 2023 | 6:36 PM

आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त (Hanuman Jayanti 2023) आपण मध्य प्रदेशातील अशाच एका प्राचीन मंदिराविषयी जाणून घेणार आहोत जे 200 वर्षे जुने आहे.

Hanuman Jayanti 2023 : या दोनशे वर्ष जुन्या हनुमान मंदिरात पुर्ण होतो प्रत्त्येकाचा नवस, कुठे आहे हे मंदिर?
हनुमान मंदिर
Image Credit source: Social Media
Follow us on

बैतुल : हिंदू धर्मात भगवान हनुमानाला संकट दूर करणारे म्हटले आहे कारण रामभक्त हनुमान सर्व संकटांतून मार्ग काढतो. बजरंगबलीच्या कृपेने सर्व मनोकामना पुर्ण होतात. असे म्हटले जाते की कलियुगात जो कोणी हनुमानजींना साद घालतो तो कधीही निराश होत नाही. हनुमान सर्व मनोकामना पूर्ण करतात. आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त (Hanuman Jayanti 2023) आपण मध्य प्रदेशातील अशाच एका प्राचीन मंदिराविषयी जाणून घेणार आहोत जे 200 वर्षे जुने आहे. या 200 वर्ष जुन्या दक्षिणाभिमुख हनुमान मंदिराबाबत असे म्हटले जाते की येथून कोणताही भक्त रिकाम्या हाताने परतत नाही. हे प्रसिद्ध हनुमान मंदिर बैतूल जिल्ह्यातील टिकारी येथे आहे.

पानावर नवस लिहून देतात भाविक

बैतुलच्या टिकारीच्या या हनुमान मंदिराविषयी असे म्हटले जाते की हे सिद्ध मंदिर असून बजरंगबलीच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परतत नाही. येथे येणारे भाविक त्यांच्या सर्व समस्या भोजपत्र, पीपळ किंवा अकवच्या पानांवर लिहून हनुमानजीसमोर सादर करतात. हनुमानजीसमोर पूर्ण भक्तीभावाने केलेला अर्जाची बजरंगबली दखल घेतात आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करतात.

शनिदेव घेतात हनुमानाचे हनुमानाचे दर्शन

जमीनदाराने बांधलेल्या या मंदिराची एक खास गोष्ट म्हणजे या हनुमान मंदिरात दररोज सकाळी शनिदेव पहिल्यांदा हनुमानजींचे दर्शन घेतात. वास्तविक मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर शमीचे झाड आहे. शमीच्या झाडावर शनिदेवाचा वास असल्याचे मानले जाते. म्हणूनच सकाळी मंदिराचे दरवाजे उघडताच शनिदेव हनुमानजीचे पहिले दर्शन देतात. असे मानले जाते की येथे केवळ हनुमानजींचे दर्शन घेतल्याने शनिदेवाचा प्रकोप दूर होतो. अनेक दशकांपासून या मंदिरात दर मंगळवारी आणि शनिवारी भाविकांची वर्दळ असते.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)