Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीला पूजा विधी केल्यास होणार संकटातून सुटका! जाणून घ्या चमत्कारीक जप पद्धती

| Updated on: Apr 03, 2023 | 4:59 PM

रामायण काळापासून संकटमोचक म्हणून मारुतीरायाची ख्याती आहे. मारुतीरायाची मनोभावे पूजा केल्यास शनि पीडेतही दिलासा मिळतो. आज आम्ही तुम्हाला योग्य पद्धतीने जप विधी कसा करावा याबाबत सांगणार आहोत.

Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीला  पूजा विधी केल्यास होणार संकटातून सुटका! जाणून घ्या चमत्कारीक जप पद्धती
Hanuman Jayanti 2023 : या दिवशी मारुतीरायाची अशा पद्धतीने करा पूजाविधी, जाणून घ्या चमत्कारीक मंत्राचा जप करण्याची पद्धत
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात मारुतीरायाकडे संकटमोचक म्हणून पाहिलं जातं. कितीही मोठं संकट असलं तरी मारुतीराया त्यातून आपल्याला बाहेर काढतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे मोठ्या भक्तिभावाने हनुमंताची पूजा केली जाते. हनुमान चालिसा, मारुतिस्तोत्र यांचं पठण केलं की मार्ग सापडतो. हनुमान त्रेता युगापासून आताच्या कलयुगातही भक्तांना संकटातून तारण्यास मदत करतो. त्यामुळे चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमानाची पूजा करणं शुभ मानलं जातं. कारण या दिवशी मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमंताच्या मंत्रांचा जाप विधीपूर्वक केल्यास लाभ होतो. चला जाणून घेऊयात चमत्कारीक मंत्रांबाबत..

हिंदू धर्मात जपाचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. मारुतिरायाची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी पूजा करताना ‘ॐ श्री हनुमते नम:’ किंवा ‘ॐ हं हनुमते नम:’ या सरळ साध्या सोप्या मंत्राचा श्रद्धेने जाप करावा. या मंत्राच्या जपामुळे बजरंगबळी भक्तांवरील संकट दूर करतो. तसेच इच्छित मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते. हा मंत्र सिद्ध झाल्यास मोठीमोठी संकट चुटकीसरशी दूर होतात.

कामनापूर्ती मंत्र

हिंदू धर्मशास्त्रानुसार पवनपुत्र हनुमानाचा एखादा जातक मनोभावे जप करतो तर त्याला इच्छित फळ मिळतं. तसेच मारुतिरायाच्या आशीर्वादामुळे संकटही सौम्य होतं. खाली दिलेल्या मंत्राच्या जपामुळे बळ, बुद्धी आणि विद्येचं वरदान मिळतं. मारुतिरायाच्या कृपेमुळे एखादं किचकट काम लगेच पूर्ण होतं. तसेच जीवनात ज्ञात-अज्ञात शत्रूचं संकट राहात नाही.

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।।

शत्रू आणि रोग नाशक मंत्र

रोजच्या जीवनात वावरतात ज्ञात-अज्ञात शत्रू असतात. त्यामुळे पावलापावलांवर संकट पाहायला मिळतं. अनेकदा काही संकट आजाररुपी असतात. त्यामुळे आर्थिक आणि शारीरिक दोन्ही पद्धतीचं नुकसान होतं. अशावेळी मारुतीरायाच्या खाली दिलेल्या मंत्राचा श्रद्धापूर्वक जप कल्यास फायदा होता.

ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रु संहारणाय सर्वरोग हराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा।।

मारुतीच्या मंत्राचा जप असा कराल

हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून लाल रंगाच्या आसनावर बसा. मारुतीच्या फोटो किंवा मूर्तीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. तसेच मारुतीची मनोभावे पूजा करा. त्यानंतर मनोकामना पूर्ण करण्यासाठी हनुमानाच्या मंत्राचा जप रुद्राक्ष किंवा मूंग्याच्या माळेवर करा. या मंत्रांचा जप करताना आपलं मूख पूर्व किंवा उत्तर दिशेला असणं गरजेचं आहे. जप करत असताना चुकूनही कुणाचं वाईट व्हावं हा हेतू नसावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)