Hanumanteshwar Mahadev : जगातले एकमेव महादेवाचे मंदिर, जिथे होतो तीळाच्या तेलाने अभिषेक

| Updated on: Jul 27, 2023 | 1:56 PM

गडकालिका ते काळभैरवाच्या वाटेवर ओखळेश्वर घाटावर श्री हनुमंतेश्वर महादेवाचे अत्यंत प्राचीन मंदिर असून ते 84 महादेवांमध्ये 79 व्या स्थानावर आहे. 

Hanumanteshwar Mahadev : जगातले एकमेव महादेवाचे मंदिर, जिथे होतो तीळाच्या तेलाने अभिषेक
हंनुमंतेश्वर
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : शिवलिंगाचा अभिषेक मोहरी आणि तिळाच्या तेलानेही केला जातो असे तुम्ही ऐकले आहे. नसल्यास, उज्जैन या धार्मिक नगरीमध्ये असलेल्या श्री हनुमंतेश्वर महादेवाला (Hanumanteshwar Mahadev) अवश्य भेट द्या. कारण हे असे जगातील एसमेव शिवलिंग आहे, जिथे शिवलिंगावर मोहरी आणि तिळाच्या तेलाने अभिषेक केला जातो. गडकालिका ते काळभैरवाच्या वाटेवर ओखळेश्वर घाटावर श्री हनुमंतेश्वर महादेवाचे अत्यंत प्राचीन मंदिर असून ते 84 महादेवांमध्ये 79 व्या स्थानावर आहे.  येथे जगातील एकमेव शिवलिंग आहे, जिथे देवाला मोहरीचे आणि तीळाचे तेल अर्पण केले जाते आणि त्यांची पूजा केली जाते आणि तिळापासून बनवलेल्या पदार्थांचा प्रसाद दिला जातो. हे एकमेव मंदिर आहे जे 24 तास खुले असते. मंदिरात कुठेही कुलूप लागत नाही.  श्री हनुमंतेश्वर महादेवाचा महिमा अनोखा आहे दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात, परंतु मंगळवार व शनिवारी मंदिरात विशेष पूजा केल्याने विशेष फल प्राप्ती होते.

पंचमुखी हनुमान शिवासोबत विराजमान आहेत

मंदिरातील भगवान शंकराच्या अत्यंत चमत्कारिक मूर्तीसोबतच पंचमुखी हनुमानाची मूर्तीही अतिशय सुंदर आहे. या मूर्तींसोबतच भगवान श्री गणेश, कार्तिक जी आणि माता पार्वती तसेच नंदीजी देखील मंदिरात आहेत. मंदिरात वर्षभर अनेक सण साजरे केले जात असले तरी हनुमान अष्टमी, हनुमान जयंती, शिव नवरात्रीचे नऊ दिवस आणि देवाचा महारुद्राभिषेक श्रावण महिन्यात विशेष केला जातो.

पवन देवाने दिले श्री हनुमतकेश्वर हे नाव

जरी या मंदिराच्या अनेक कथा प्रचलित आहेत, परंतु असे सांगितले जाते की लंका जिंकल्यानंतर जेव्हा हनुमानजी भगवान श्रीरामांना भेटण्यासाठी शिवलिंग भेट म्हणून घेऊन जात होते, तेव्हा त्यांनी काही काळ महाकाल वनात राहून शिवलिंगाची पूजा केली. या पूजेनंतर महादेव विराजमान झाले कारण हनुमान त्यांना सोबत घेऊन आले होते. म्हणूनच या मंदिराचे नाव श्री हनुमंतेश्वर महादेव आहे.

हे सुद्धा वाचा

पंचमुखी हनुमानाची मूर्ती आजही मंदिरात आहे, तर या मंदिराची कथा असेही सांगते की, हनुमान लहानपणी भगवान सूर्याला चेंडू समजून पकडायला गेले होते. त्याचवेळी भगवान इंद्राने त्याच्यावर विजांचा कडकडाट केला होता. महाकाल वनातील शिवलिंगाची पूजा केल्यावरच हनुमानजींना चैतन्य प्राप्त झाले. तेव्हापासून पवन देवाने या शिवलिंगाचे नाव श्री हनुमंतेश्वर महादेव असे ठेवले आणि त्यामुळेच ते या नावाने प्रसिद्ध झाले.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)