मुंबई : लग्नाच्या काही काळानंतर वैवाहिक आयुष्यात कलह निर्माण होतात. पती- पत्नीमध्ये वाद होण्यास सुरुवात होते. कधी कधी हे वाद एवढे विकोपाला जातात की नाते दुरावले जाते. सामजस्यांनी वाद संपवण्याच्या ऐवजी या काळात लोक मी पणा घेऊन बसतात. पण आपल्या पुराणामध्ये पती- पत्नीमध्ये बिघडण्याऱ्या संबधांबद्दल अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. या साध्या योजनांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आलेले वादळ तुम्ही कमी करु शकत. आणि उत्तम आयुष्य जगू शकता.
जर पती -पत्नीमध्ये प्रेम आणि सुसंवादाची कमतरता असेल. पती -पत्नींपैकी कोणी एक खूश नसेल. तर दापत्यांनी पौर्णिमेला व्रत ठेवावा आणि संध्याकाळी चंद्र देवाला एकत्र प्रार्थना करा. वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी, प्रत्येक सोमवारी ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राच्या 11 माळांचे पठण करावे आणि शंकराला 54 बेलाची पाने अर्पण करा.
वैवाहिक जीवनासाठी पत्नीने प्रत्येक सोमवारी व्रत ठेवावे आणि त्याचबरोबर प्रत्येक सोमवारी पांढऱ्या वस्तूंचे विशेष दान करावे.
वैवाहिक जीवनातील वाद संपवण्यासाठी पत्नीने सूर्यास्तानंतर हलके पिवळे, गुलाबी रंगाचे कपडे घालावेत आणि झोपताना हे ठरवले पाहिजे की ती वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची कलह निर्माण करू शकणार नाही.
जर पती -पत्नी दोघेही रागाच्या स्वभावाचे असतील आणि दोघांमध्ये खूप भांडणे होत असतील तर त्यांना प्रथम वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी धीर धरायला शिकावे लागेल. यानंतर या मंत्राचा दररोज 108 वेळा पाठ करावा.“सर्व मंगलमंगल्ये शिवाय सर्वार्थसाधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु ते .. ”हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात जादूई बदल घडतात.
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्हाला मतभेद टाळायचे असतील तर घरात काटेरी रोपे कधीही लावू नका, किंवा तुमच्या घराच्या दरवाजावर तलवार, भाला, बाण, चाकू किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू ठेवू नका. जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर नक्कीच पती -पत्नी वाद निर्माण होतील.
इतर बातम्या :
17 October 2021 Panchang | कसा असेल रविवारचा दिवस, काय असतील शुभ – अशुभ मुहूर्त जाणून घ्या
‘या’ 3 राशीचे लोक नेहमी असतात निराशावादी, जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्वकाही
17 October 2021 Panchang | कसा असेल रविवारचा दिवस, काय असतील शुभ – अशुभ मुहूर्त जाणून घ्या https://t.co/aLCUqY54u4#Panchang | #17October2021| #Panchang
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2021