भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरितालिका व्रत पाळले जाते. यावर्षी हरतालिका (Hartalika 2022) 30 ऑगस्ट 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने व्रत आणि पूजा करतात. याशिवाय विवाह इच्छुक मुली चांगल्या वराच्या प्राप्तीसाठीसुद्धा हे व्रत ठेवतात. हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिकेचे विवाहित महिलांसाठी विशेष महत्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. हरतालिका व्रत (Hartalika vrat) अविवाहित आणि विवाहित स्त्रिया दोघेही ठेऊ शकतात. वट सावित्रीच्या व्रताप्रमाणेच हरतालिकेचे व्रत निर्जल ठेवले जाते. पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वती यांनी भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. हरतालिका व्रत केल्याने महिलांना वैवाहिक सुख मिळते अशीही मान्यता आहे.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत पाळले जाते. विवाहित स्त्रिया हरितालिका व्रत करतात. यावर्षी हे व्रत 30 ऑगस्ट 2022 ला आलेले आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 29 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03:20 ते 30 ऑगस्ट 2022 ला दुपारी 03:33 पर्यंत असेल. 30 ऑगस्टला सकाळी 06:05 ते 08:38 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल.
पतीप्रती आपली सद्भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच इच्छित पती मिळावा यासाठी हरतालिकेच्या व्रताचे पालन करण्यात येते. इच्छित वर मिळावा म्हणून विवाह इच्छुक मुलीही हरतालिकेचे व्रत करतात. व्रतात आठ प्रहर उपवास केल्यानंतर अन्नसेवन करण्यात येते. व्रतापासून मिळणार्या फळाचे वर्णन ‘अवैधव्यकारा स्त्रीणा पुत्र-पौत्र प्रर्वधिनी’ असे करण्यात आले आहे. अर्थात जीवनात सुख लाभण्यासाठी व्रताचे विधिपूर्वक पालन करण्यास सांगण्यात आले आहे. भविष्योत्तर पुराणानुसार हरतालिका व्रताच्या दिवशी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेस ‘हस्तगौरी, ‘हरिकाली व ‘कोटेश्वरी’ व्रताचेही पालन करण्यात येते. यामध्ये आदी शक्तीमाता पार्वतीचे गौरीच्या रूपात पूजन करण्यात येते. भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशीच हस्तगौरी व्रताचे अनुष्ठान होते. महाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत असल्याचे संदर्भ आढतात. भगवान श्रीकृष्णाने राज्यप्राप्तीसाठी, धन-धान्याच्या समृद्धीसाठी कुंतीस या व्रताचे पालन करण्यास सांगितले होते. यामध्ये 13 वर्षांपर्यंत शिव-पार्वती व श्रीगणेशाचे ध्यान करण्यात येते. चौदाव्या वर्षी व्रताचे उद्यापन करण्यात येते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)