मुंबई : गरुड पुराण हिंदू धर्मातील 18 प्रमुख पुराणांपैकी एक मानले जाते (Garuda Purana). भगवान विष्णू आणि त्याचे पक्षी गरुड यांच्यातील संभाषणाबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय स्वर्ग, नरक, पाप, पुण्य आणि मृत्यू वगळता ज्ञान, विज्ञान, भक्ती, पुण्य आणि धर्म या सर्व गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. या माध्यमातून सामान्य माणसाला कल्याणाचा मार्ग दाखविला गेला आहे. गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टींचे अनुसरण केल्यास आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांना टाळता येते (Having Food In These 10 Houses Creates Problems According To Garuda Purana).
या प्रकरणात, गरुड पुराणात 10 अशा घरांचा उल्लेख केला आहे, जेथे जेवण केल्याने एखादी व्यक्ती पापाचा भागीदार बनते. कारण, अन्नाद्वारे त्या व्यक्तीचे विचार आणि त्याच्या घराची ऊर्जा शरीरात प्रवेश करते. जर विचार आणि ऊर्जा नकारात्मक असेल तर ते आपल्यावर समान प्रभाव टाकतील. अशा 10 घरांबद्दल जाणून घ्या जिथे जेवण करणे निषिद्ध मानले जाते.
1. ज्यांना खूप राग येतो, त्यांच्या घरी जेवण करणे टाळावे, अन्यथा त्यांची गुणवत्ता तुमच्यातही येऊ शकते. म्हणूनच असे म्हटले जाते की जसे अन्न, तसे मन.
2. जो राजा अत्यंत क्रूर असेल, प्रजेचा छळ करत असेल, त्याच्या घरचं जेवण कधीही ग्रहण करु नये. हे अन्न आपल्याला त्याच्या पापाचे भागीदार बनवतात.
3. किन्नर सर्व प्रकारच्या लोकांकडून दान घेतात, म्हणजेच त्यांच्या घरात प्रत्येक प्रकारचं धन येतं. म्हणून, त्यांच्या घरी जेवण करु नये.
4. जर तुम्ही चोर किंवा गुन्हेगाराच्या घरात जेवण कराल तर त्याच्या घराची नकारात्मकता तुमच्या शरीरातही येते आणि यामुळे तुमचे विचारही भ्रष्ट होतात. म्हणून अशा लोकांच्या घरी जेवण कधीही करु नका.
5. ज्या घरातील लोक आजारी आहेत, त्यांच्या घरात बॅक्टेरिया असू शकतात, अशा लोकांच्या घरात जेवण करण्यास टाळावे.
6. चरित्रहीन पुरुष किंवा स्त्रीच्या घरात जेवण करु नये. असे जेवणाचं सेवन केल्याने आपल्याला देखील पाप लागते.
7. ज्या व्यक्तीमध्ये दयाळूपणा नाही, जो दुसर्यांशी गैरवर्तन करतो, इतरांवर अत्याचार करतो, त्या व्यक्तीच्या घरातील जेवण पाप असते.
8. जे लोक इतरांना फसवतात, ते कोणालाही अडचणीत आणू शकतात. अशा लोकांपासून दूर रहावे आणि त्यांच्या घरी कधीही जेवू नये.
9. जे लोक मादक पदार्थांचे सेवन करतात आणि त्यांची विक्री करतात त्यांच्या घरी जेवण करु नये. ते आपले आणि इतरांचे घर उध्वस्त करतात.
10. जे लोक व्याज घेतात, त्यांची संपत्ती कधीच चांगली मानली जात नाही. कारण, असे लोक एखाद्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन पैसे कमवतात. ती पापाची कमाई मानली जाते. अशा लोकांच्या घरी काहीही खाणे टाळावे.
Kalki Avtar | कोरोना काळात भगवान विष्णूच्या कल्की अवताराची चर्चा का?https://t.co/gK00Ep8ujB#KalkiAvtar #CoronaVirus #LordVishnu
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 12, 2021
Having Food In These 10 Houses Creates Problems According To Garuda Purana
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Akshaya Tritiya 2021 | अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या राशीनुसार दान करा, घरात समृद्धी नांदेल