Holi 2023 : वाराणसीमध्ये बाबा विश्वनाथासोबत खेळली गेली भस्म होळी, सुरू झाला पाच दिवसांचा महोत्सव

| Updated on: Mar 04, 2023 | 3:08 PM

रंगभरी एकादशीला स्मशानभूमीत खेळल्या जाणाऱ्या या अनोख्या होळीमागे एक प्राचीन समज आहे की, माता पार्वतीची पाठवणी करून भगवान विश्वनाथ जेव्हा काशीला पोहोचले तेव्हा त्यांनी आपल्या गणांसह होळी खेळली.

Holi 2023 : वाराणसीमध्ये बाबा विश्वनाथासोबत खेळली गेली भस्म होळी, सुरू झाला पाच दिवसांचा महोत्सव
भस्म होळी
Image Credit source: Social Media
Follow us on

वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये बाबा विश्वनाथ यांच्यासोबत भाविकांनी आज भस्म होळी (Bhasma Holi 2023) खेळली. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला रंगभरी एकादशी म्हणतात. या दिवशी काशीमध्ये बाबा विश्वनाथ यांच्यासोबत भस्म होळी खेळण्याची प्रथा आहे. या वेळी बाबा भोलेनाथ यांचा विशेष श्रृंगारही केला जातो. काशीतील लोकं प्रथम  त्यांच्या प्रिय बाबा विश्वनाथासोबत भस्माची होळी खेळून होळी सुरू करतात. या दरम्यान,  स्मशानभूमीत चितेच्या राखेने होळी खेळून उत्सवाची सुरुवात केली जाते, त्यानंतर काशीमध्ये होळीचा उत्सव सुरू होतो.

ही आहे भस्म होळीमागची श्रद्धा

रंगभरी एकादशीला भाविकांनी नाच-गाणी गात हवेत रंग उडवत हा उत्सव साजरा केला. येथे सर्वत्र पसरलेल्या चितेंमध्ये, वर्षातून एक दिवस असा येतो जेव्हा मोठ्या स्मशानभूमीत होळी खेळली जाते. रंगभरी एकादशीला स्मशानभूमीत खेळल्या जाणाऱ्या या अनोख्या होळीमागे एक प्राचीन समज आहे की, माता पार्वतीची पाठवणी करून भगवान विश्वनाथ जेव्हा काशीला पोहोचले तेव्हा त्यांनी आपल्या गणांसह होळी खेळली. पण स्मशानभूमीत राहणाऱ्या भूत, पिशाच, प्रेत आणि अघोरींसोबत त्याला होळी खेळता आली नाही. म्हणूनच, रंगभरी एकादशीपासून सुरू झालेल्या पाच दिवसांच्या होळी उत्सवाच्या पुढच्या भागात, विश्वनाथ चिता-भस्मासह होळी खेळण्यासाठी स्मशानभूमीत येतो, ज्याची सुरुवात हरिश्चंद्र घाटावर महाशंशान नाथांच्या आरतीने होते. यानंतर पहिली मिरवणूकही काढली जाते.

शतकानुशतके जुनी परंपरा

या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या डोम राजा परिवारातील पवन चौधरी यांनी सांगितले की, ही शतकानुशतके जुनी परंपरा सुरू आहे. भगवान भोलेनाथ आणि पार्वतीचे गीत गात भूत आणि त्यांचे गण होळी खेळण्यासाठी स्मशानात येतात. कीनाराम आश्रमातून बाबांची मिरवणूक काढली जाते आणि ती हरिश्चंद्र घाट येथे येते. यानंतर महास्मशान नाथांची पूजा व आरती होते व तेथून बाबा आपल्या गणांसह चिताभस्माची होळी खेळतात.

हे सुद्धा वाचा

डोम राजा परिवारातील पवन चौधरी यांनी पुढील वर्षी वाराणसीतील या अप्रतिम चिता भस्म होळीसाठी पीएम मोदी आणि सीएम योगी यांना आमंत्रित केले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजकांपासून ते शिवरूपात अवतरलेल्या कलाकारांपर्यंत सर्वजण यात सहभागी होण्यातच धन्यता मानतात.

काशीचे लोकं महान स्मशानभूमीला अस्पृश्यता आणि अशुभपासून मुक्ती आणि नवजीवन मिळवण्याचे द्वार मानतात. त्यामुळेच रंगांच्या होळीपूर्वी केवळ चिता-भस्माच्या होळीत सहभागी होऊन होळीचा आनंद अनेक पटींनी वाढतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)