मुंबई : फाल्गुन पौर्णिमेला होळी सण (Holi) साजरा केला जातो. यंदा होलिका दहन आज 6 मार्चला होणार असून रंगांची होळी उद्या 7 मार्चला खेळली जाणार आहे. रंगांचा सण असलेल्या होळीच्या धार्मिक महत्त्वाचा विचार केला तर सर्वप्रथम मनात भक्त प्रल्हाद आणि त्याची मावशी होलिका यांचा उल्लेख येतो पण तुम्हाला माहित आहे का की या सणाशी संबंधित इतरही अनेक पौराणिक कथा आहेत. आज आम्ही तुम्हाला देवलोकावर खेळल्या गेलेल्या पहिल्या होळीबद्दल सांगत आहोत.
होळी सणाची पौराणिक कथा भगवान शंकर आणि भगवान विष्णू या दोघांशी संबंधित आहे. हरिहर पुराणातील कथा सांगते की जगातील पहिली होळी देवाधिदेव महादेव यांनी खेळली होती ज्यात प्रेमाचा देव कामदेव आणि त्यांची पत्नी रती उपस्थित होते. ही कथा सांगते की भगवान शंकर कैलासावर समाधीमध्ये मग्न असताना कामदेव आणि रती तारकासुराचा वध करण्यासाठी शिवाला ध्यानातून जागे करण्यासाठी नाचले.
रती आणि कामदेव यांच्या नृत्याने भगवान शिवाची समाधी विचलित झाली, तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या क्रोधाच्या अग्नीने कामदेवाला भस्मसात केले. रतीने प्रायश्चित्त म्हणून शोक केला तेव्हा परम दयाळू भगवान शंकरांनी कामदेवाला पुन्हा जिवंत केले. त्यामुळे प्रसन्न होऊन रती आणि कामदेव यांनी ब्रजमंडळात ब्रह्मभोज आयोजित केला ज्यामध्ये सर्व देवता सहभागी झाल्या. चंदनाचा टिळा लावून होळी साजरी केली. फाल्गुन पौर्णिकेचा दिवस होता असे म्हणतात.
हरिहर पुराणानुसार, ब्रह्मभोजात भगवान शंकर ढोलकी वाजवतात तर भगवान विष्णू बासरी वाजवतात. माता पार्वतीने वीणावर तरंग निर्माण केले आणि माता सरस्वतीने वसंत ऋतूतील रागात गाणी गायली. तेव्हापासून पृथ्वीवर दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला गाणी, संगीत आणि रंगांनी होळीचा सण साजरा केला जात असे.
होळीच्या दिवशी देवाला गुलाल वाहा. होलिका दहनातून आणलेल्या भस्माने शिवलिंगाला अभिषेक केल्यास शुभ फळ मिळते. यानंतर तुम्ही कोणत्याही आवडत्या रंगाने होळी खेळू शकता. यामुळे लोकांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)