मुंबई : हिंदू धर्मानुसार होलिका दहन (Holika Dahan) फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते. आज 6 मार्चला होलीका दहन आहे. या दिवशी विधीपूर्वक पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की होलिका दहनाची पूजा केल्याने येणारे संकट दूर होतात. होलिका दहन करताना कोणतीही चूक करू नये. ही चूक तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अडचणीत आणू शकते. त्यामुळे घरात नकारात्मकता येते. अशा परिस्थितीत पूजेसाठी योग्य पुजा सामग्री जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
होलिका दहनाच्या दिवशी शेणाच्या पोळी आणि लाकडापासून शेण पेटवला जातो. या दिवशी पूजेच्या साहित्यात रोळी, कच्चा सूत, अक्षत, फुले, अख्खा मूग, बत्ताशे, नारळ, गव्हाच्या ओंब्या आणि पाण्याने भरलेले भांडे ठेवावे. या सर्व गोष्टींसह पूजा करा. होलिका दहनानंतर प्रदक्षिणा करायला विसरू नका.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)