मुंबई : शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. असे मानले जाते की (Worship Goddess Lakshmi Statue), घरात शांती आणि समृद्धी राखण्यासाठी या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे. यामुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते. पण, अनेकदा पूजा केली तरी घरात आर्थिक समस्या असते. याचे कारण म्हणजे बर्याच वेळा लोक जाणीवपूर्वक किंवा नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांना पूजेचे फळ मिळत नाही (How To Worship Goddess Lakshmi Statue For Happiness And Wealth).
अनेक वेळा देवी लक्ष्मीच्या मूर्तीबाबत असे घडते. म्हणून देवी लक्ष्मीच्या मूर्तीशी संबंधित काही विशेष गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, जेणेकरुन आपली पूजा विफल होऊ नये आणि देवीची कृपा राहावी.
असे म्हणतात की घरात अंगठ्याच्या उंचीइतकीच लक्ष्मीजींची मूर्ती स्थापित करावी. जर आपण घरात त्यापेक्षा उंच मूर्ती स्थापित केली तर तिच्या पूजेचे नियम देखील कठोर बनतात आणि नंतर ते पूर्ण न केल्यास मूर्ती दोष लागतो.
देवी लक्ष्मीच्या मूर्तीविषयी हे देखील लक्षात घ्यावे, की देवी लक्ष्मी नेहमीच गणपतीच्या उजव्या बाजूला विराजमान असतात. अशा स्थितीत देवीची मूर्ती घरात विराजमान करताना देखील उजव्या बाजूला ठेवली पाहिजे.
लक्षात ठेवा की देवी लक्ष्मीची उभी असलेली मूर्ती किंवा छायाचित्र घरात कधीही ठेवू नये. जेव्हा तुम्ही लक्ष्मी देवीची मूर्ती स्थापित कराल तेव्हा ती नेहमी बसलेल्या मुद्रेत असावी.
घरात जेव्हा लक्ष्मीची मूर्ती घरात ठेवली जाते, तेव्हा ती कधीही भिंतीला चिकटून ठेवू नये. आईच्या मूर्तीमध्ये आणि भिंतीत किमान एक इंच अंतर असले पाहिजे.
सर्वतोपरी प्रयत्न करा की गणेश आणि देवी लक्ष्मी यांची मूर्ती एकत्रित विराजमान करण्याऐवजी त्यांच्या स्वतंत्र मूर्ती बसवाव्यात.
तसेच, घुबडवर स्वार असलेल्या देवी लक्ष्मीची प्रतिमा किंवा फोटो घरात स्थापित करु नये. असे मानले जाते की यामुळे घरात आर्तिक अस्थिरता होते.
शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. जी धन-संपत्तीची देवी आहे. मान्यता आहे की, प्रत्येक शुक्रवारी देवीची पूजा संपूर्ण विधीवत केली तर आर्थिक भरभराट होते. असे मानले जाते की शुक्रवारच्या उपासनेने यशाची प्राप्त होते.
Lakshmi Panchami 2021 | लक्ष्मी पंचमीच्या दिवशी या प्रकारे करा पूजा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल…https://t.co/zpVjSSmdRA#LakshmiPanchami2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 17, 2021
How To Worship Goddess Lakshmi Statue For Happiness And Wealth
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Kamada Ekadashi 2021 | कामदा एकादशी तिथी, वेळ, महत्त्व आणि कथा, जाणून घ्या…