मुंबई : देवी-देवतांच्या आवाहनासाठी पूजेदरम्यान दिवा लावणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भगवंताच्या पूजेत अगरबत्ती आणि धूप लावण्यालाही तितकेच महत्त्व आहे. उदबत्तीच्या सुगंधाने वातावरण शुद्ध होते आणि देव लवकर प्रसन्न होतात, अशी धार्मीक श्रद्धा आहे. घरांमध्ये धूप करण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो, धुपामध्ये टाकलेल्या वेगवेगळ्या सामग्री आपल्याला विविध प्रकारची फळे देतात. यापैकी एक म्हणजे गुग्गूळचा धूप. चला जाणून घेऊया घरी गुग्गूल धूप (Guggul Dhup Upay) जाळण्याचे फायदे.
गुग्गल धूप खूप फायदेशीर मानली गेली आहे. जर कुटुंबात दररोज संकटे येत असतील. पती-पत्नीमध्ये नेहमी वादाचे प्रसंग उद्भवत असतील तर रोज गुग्गूळाचा धूप लावावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि वातावरण तणावमुक्त होईल.
असे मानले जाते की गुग्गलमध्ये वाईट शक्तींना दूर ठेवण्याची क्षमता आहे. याच्या धुरामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. ज्योतिष शास्त्रानुसार 7 दिवस पिंपळाच्या पानांसह संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडावे नंतर नकारात्मक उर्जा दुर करण्यासाठी गुग्गूळचा धूप जाळावा. यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट होईल.
कधी-कधी वास्तुदोष, पितृदोष यामुळे माणसाला अनेक प्रयत्न करूनही यश मिळू शकत नाही. यामध्ये गुग्गूळ, पिवळी मोहरी, गाईचे तूप आणि धूप मिसळा याचा रोज संध्याकाळी धूप करा सर्व कामं कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील.
गुग्गूळमध्ये अनेक फायदेशीर घटक आहेत. याच्या वासामुळे हवेतील जंतू नष्ट होतात असे म्हणतात. पावसाळ्यातील बहुतांश आजार हे जीवाणू आणि विषाणूंच्या प्रसारामुळे होतात. गंभीर आजार टाळण्यासाठी गुग्गूळचा धूप रोज करावा. यामुळे वातावरण शुद्ध आणि सुगंधित राहील. या धूपाचा सुगंध केवळ देवांनाच प्रसन्न करत नाही तर माणसाचा मानसिक थकवाही दूर करतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)