मुंबई : देशभरात कोरोनाचा कहर आहे, त्यामुळे सर्वचजण चिंतीत आहेत (Anxiety And Depression). अनेकांचा बळी या कोरोनाने घेतला, अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत, यामुळे काही लोक तणावाखाली दिसत आहेत. यामुळे, बहुतेक लोकांना एंग्जाइटी (Anxiety) आणि भीती सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. अनेक राज्यात लॉकडाऊन लादण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त लोकांना ट्रिपल लेयर मास्क घालण्याचा, वारंवार हात स्वच्छ करण्याचा आणि सामाजिक अंतर अवलंबण्यास सांगितले जाते. गेल्यावर्षी, सतत घरात राहिल्यामुळे बहुतेक लोकांना चिंता आणि नैराश्याचा सामना करावा लागला. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून मनाला शांत ठेवणे फार महत्वाचे आहे (If You Are Suffering From Anxiety And Depression During Work From Home Chant These Four Mantras).
मनाला शांत ठेवण्यासाठी ध्यान करण्याबरोबरच काही विशेष मंत्रांचा जप केला जाऊ शकतो. या मंत्रांमध्येा इतके सामर्थ्य आहे की ते आपले मन केवळ शांत ठेवत नाही तर तणाव, चिंता आणि नैराश्यासारख्या समस्यांवर देखील मात करते. जर आपण ज्योतिषावर विश्वास ठेवत असाल तर या मंत्रांचा जप केल्यास आणखी बरेच फायदे होऊ शकतात. चला जाणून घेऊया ते कोणते मंत्र आहेत.
असे काही मंत्र आहेत जे तुमच्या मनाला शांती देतात तसेच तुम्हाला निरोगी ठेवतात. आपले मनोबल वाढवतात. त्यातील एक शिव मंत्र म्हणजे “ॐ नमः शिवाय”. हा मंत्र भगवान शिव यांचा एक अतिशय सोपा आणि प्रभावी मंत्र आहे. रुद्राक्षच्या जपमाळेने जप केल्यास भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात. या मंत्राचा 108 वेळा रुद्राक्षच्या माळेने जप करावा. हा मंत्र तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही वाचू शकता. भगवान शिव यांचे ध्यान केल्याने तुम्हाला शांती तर मिळतेच, शिवाय सर्व त्रासही दूर होतात. मनाला शांत करण्यासाठी तुम्ही भगवान शिव यांचे नाव घ्या आणि त्याच्या मंत्राचा जप करा.
चार वेदांत गायत्री मंत्राचा उल्लेख आहे. बहुतेक ध्यान करणारे या मंत्राचं पठण करतात. “ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्” – या मंत्राचे रचेता ऋषी विश्वामित्र आहेत आणि देवता सविता आहेत. असे मानले जाते की या मंत्रात इतकी शक्ती आहे की जो नियमितपणे या मंत्राचा तीन वेळा जप करतो त्याच्याजवळ नकारात्मक शक्ती आणि अडथळे भटकतही नाही. गायत्री मंत्राचा जप सूर्योदय होण्याच्या दोन तास आधीपासून सूर्यास्तानंतर एक तासापर्यंत करता येतो. मौन मानसिक जप कोणत्याही वेळी करता येईल, परंतु रात्री तुम्ही या मंत्राचा जप करु नये.
मनाला शांत करण्यासाठी आणि तणावापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही भगवान विष्णूच्या “ॐ नमो भगवते वासुदेवाय'” या मंत्राचा जप करु शकता. हा द्वादश अक्षर मंत्र म्हणजे भगवान विष्णूचा अमोघ मंत्र आहे. मान्यता आहे की, या मंत्राचा जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो. मान्यता आहे की या मंत्राचा जप केल्याने पितृ दोषातून मुक्तता मिळते. सूर्यास्तापूर्वी या मंत्राचा जप केल्याने फायदा होतो. शास्त्रानुसार, भगवान विष्णू जगाचे पालनहार आहेत. भगवान विष्णूचे रुप शांत आणि आनंददायक आहे. म्हणून मनाला शांत करण्यासाठी या मंत्राचा जप करावा.
मनाला शांती मिळावी म्हणून दररोज 108 वेळा “ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात” या मंत्राचा चा जप करावा. गणपतीचे भक्त दर बुधवारी या मंत्राचा जप करु शकतात. परंतु शांततेसाठी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी या मंत्राचा जप करु शकता. असे मानले जाते की, 11 दिवस शांत मनाने या मंत्राचा जप केल्याने भगवान गणेश सर्व मनोकामना पूर्ण करतात. त्याचबरोबर तणावातून मुक्त होण्यासाठीही या मंत्राचे पठण करता येते.
Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ तीन गुरुमंत्र तुम्हाला लोकांचे प्रिय बनवतीलhttps://t.co/ZpDLJV3bEN#ChanakyaNiti #AcharyaChanakya
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 12, 2021
If You Are Suffering From Anxiety And Depression During Work From Home Chant These Four Mantras
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
हवन केल्याने वास्तु आणि ग्रह दोषातून मुक्तता मिळेल, जाणून घ्या याचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व
Vastu Tips : जीवनातील समस्या सोडवण्यासाठी घरात याप्रकारे करा गंगाजलचा वापर, सुख-समृद्धी नांदेल