Chanakya Niti : रोज ‘हे’ काम कराल तर कायम मालामाल राहाल
आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये अशा काही कामांचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे तुमचे नशीब तर उजळतेच पण सोबतच लक्ष्मी मातेची विशेष कृपा राहते आणि धनाची तिजोरी नेहमी भरलेला राहतो.
1 / 5
आचार्यांचा असा विश्वास होता की, दुष्ट माणूस आणि नीच स्वभावाच्या व्यक्ती पासून लांब रहा. जो निरुपयोगी आणि व्यसनाधीन आहे. त्याला कोणतेही मित्र नसतात. तो फक्त त्याचे काम करण्यासाठी मित्र बनवतो. असे लोक इतरांचाही नाश करतात. त्यांच्याशी कोणताही संबंध न ठेवणे हेच तुमच्या हिताचे आहे.
2 / 5
वाईट सवयी असलेल्या, चुकीच्या व्यसनांच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले आहे. अशी लोक तुम्हाला ही चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात. अशा लोकांच्या संगतीत आल्याने तुमच्या मान संन्मानालाही ठेच पोहचू शकते.
3 / 5
तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल, तर तुमचे इरादे मजबूत ठेवा. रोज सकाळी उठून स्वतःला सांगा की तुम्ही हे काम करू शकता. त्यामुळे ते काम करण्याचा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नकारात्मकता दूर होईल.
4 / 5
देवाप्रती तुमच्या मनात जे काही असेल ते कागदावर उतरवा आणि परमेश्वरासमोर वाचा. परमेश्वर तुमचे हृदय वाचतो. परमेश्वरासमोर अशी स्तुती वाचून तुमचा त्याच्याशी थेट संबंध येतो. अशा स्थितीत देव तुमची सर्व बिघडलेली कामं घडवून आणतो. तुमच्या जीवनातील अडथळे दूर करतो. यामुळे तुमचे दुर्दैव सुदैवात बदलते.
5 / 5
ज्या घरांमध्ये अन्नाचा साठा कधीच संपत नाही, जिथे स्त्रियांचा आदर केला जातो, पती-पत्नी एकमेकांसोबत प्रेमाने राहतात, तिथे लक्ष्मी मातेचा वास सदैव असतो. त्या घरात नेहमी तिजोरी भरलेला असतो.