प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येने वेढलेली आहे. कुणाला पैशांची कमतरता आहे, तर कुणाला आरोग्याच्या समस्या आहेत. अनेक प्रयत्न करूनही घरात पैसा राहत नाही. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात पैसा कमवायचा असतो. तसेच कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी कठोर परिश्रम करून पैसा कमवावा लागतो. त्यातच आपण सर्वजण भविष्यातील काही गरजा लक्षात घेऊन नेहमी पैशांची बचत करत असतो. मात्र काही केल्यास पैशांचे आर्थिक नियोजन नीट होत नाही यासाठी काही पद्धती अवलंबणे महत्वाचे आहे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार काही उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कधीही पैशांची समस्या उद्भवू शकत नाही. तसेच तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याचे आरोग्य देखील चांगले राहिलं. चला तर मग जाणून घेऊया ते उपाय.
ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या देवघरात या दोन मुर्त्या ठेवल्यास तुम्हाला कधीच पैशांची कमतरता भासणार नाही. तसेच या देवघरात या मुर्त्या ठेवल्याने घरात सुरु असलेल्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी समस्या दूर होतील. तसेच घरात आर्थिक नियोजन देखील योग्य पद्धतीने होते. चला तर मग जाणून घेऊया देवघरात देवी-देवतांच्या कोणत्या दोन मूर्ती ठेवाव्यात.
वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही भरपूर पैसे कमवत असाल, तरीही पैशांची योग्य बचत होत नाही. नको तिथे जास्त पसे खर्च होतात. तर अशा परिस्थितीत तुम्ही देवघरात लक्ष्मी देवी आणि भगवान कुबेर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. धार्मिक मान्यतेनुसार घरातील मंदिरात या दोन देवी-देवतांची मूर्ती स्थापित केल्यास पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होऊन तुम्ही पैशांची योग्य पद्धतीने बचत करतात.
वास्तुशास्त्रानुसार देवघरात लक्ष्मी देवी आणि भगवान कुबेर या दोन देवी आणि देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर त्यांची नियमित पूजा करावी, असे सांगितले जाते. असे केल्याने तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. असे मानले जाते की भगवान कुबेर आणि लक्ष्मी देवीची पूजा केल्याने घरात अचानक धन प्राप्त होते. त्याचबरोबर व्यक्ती नेहमी आनंदी राहते. आरोग्यच्या समस्या देखील दूर होतात.