मुंबई : दिवसभराचा संपुर्ण थकवा दूर करण्यासाठी आपण झोपतो (Sleep), पण यावेळी देखील आपल्या विचाऱ्यांचे चक्र सुरुच असते. काही जणांच्या मते आपण दिवसभर जे विचार करतो अवचेतन मन (Subconscious Mind) साठवून ठेवते आणि झोपल्यानंतर आपल्याला त्या विचारांचा एक संच दिसतो. त्यामुळेच कदाचित काही स्वप्नाचा संदर्भ आपल्याला लागत नाही. अग्निपुराणानुसार आपली स्वप्ने आपल्याला शुभ अशुभ संकेत देत असतात. त्यांचा आपल्या आयुष्यावर खोल परिणाम होतो. स्वप्न शास्त्र ही ज्योतिषाची(Jyotish Shashtra) एक शाखा आहे, ज्यामध्ये सर्व स्वप्नांचे विश्लेषण केले आहे. सपना शास्त्रानुसार स्वप्ने शुभ आणि अशुभ फलही देतात. प्रत्येक स्वप्नाचा वेगळा अर्थ असतो . जर तुम्हाला स्वप्नात पाणी दिसले तर हे स्वप्न शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकते कारण पाण्याच्या वेगवेगळ्या स्थिती जीवनाच्या वेगवेगळ्या परिस्थिती दर्शवतात . समुद्राचे पाणी, नदीचे पाणी, पावसाचे पाणी आणि स्वच्छ पाणी या सर्वांचे वेगवेगळे अर्थ आहेत. जर तुम्हालाही पाण्याशी संबंधित एखादे स्वप्न पडले असेल, तर येथे तुम्ही त्याचा अर्थ जाणून घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात तुमची स्वप्नं तुम्हाला काय सांगतात.
समुद्राच्या पाणी स्वप्नात पाहणे
स्वप्नं शास्त्रानुसार स्वप्नात समुद्र दिसला तर ते शुभ मानले जात नाही. वास्तविक पाहता समुद्र खूप खोल आहे आणि त्यात एक जिवन असते. त्यामुळे हे पाणी पाहणे खूपच धोकादायक मानले जाते. असे पाणी पाहील्यास भविष्यात अशा काही समस्या समोर येऊ शकतात, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. समुद्राचे पाणी देखील पैशाचे नुकसान आणि कोणत्याही अपघाताचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे.
नदीचे पाणी
स्वप्न शास्त्रानुसार नदीचे पाणी पाहणे शुभ मानले जाते. धर्मग्रंथात नदीला पवित्र मानले गेले आहे. नदीत स्नान केल्याने पाप धुऊन जाते. नद्यांचे पाणी माणसाच्या जीवनासाठीही खूप उपयुक्त आहे. अशा वेळी जर तुम्हाला नदी दिसली तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यातील सर्व त्रास आता संपू शकतात. तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.
पावसाचे पाणी
पावसाचे पाणी माणसाला यश दर्शवते. असे म्हणतात की जर तुम्हाला पावसाचे पाणी दिसले तर समजून घ्या की तुम्हाला धनाचा मोठा फायदा होईल कारण पावसाचे पाणी पिकाचे पोषण करते आणि पीक हे समृद्धीचे प्रतीक आहे. पावसाचे पाणी पाहून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. काही रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
स्वच्छ पाणी
स्वप्न शास्त्रानुसार स्वच्छ पाणी पाहणे देखील शुभ मानले जाते. हे तुमची स्वच्छ प्रतिमा दर्शवते. जर तुम्हाला असे काही दिसले तर समजून घ्या की कामाच्या ठिकाणी तुमचा दर्जा वाढू शकतो, अशा स्थितीत तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. याशिवाय समाजात वाढता आदरही दर्शवतो. त्याच प्रमाणे तुमच्या यशामध्ये वाढ होऊ शकते.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या :
12 march 2022 Panchang | 12 मार्च 2022, शनिवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
Chanakya Niti| गगनात उंच भरारी घ्यायची आहे ? , यश हवंय मग या 5 गोष्टींपासून चार हात लांबच राहा