सनातर परंपरेत प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला नाहीतर सण-समारंभाला समर्पित आहे. रविवारचा दिवस नवग्रहांचे (Navgrah)राजा मानले गेलेले सूर्य ग्रहाची साधना-आराधना करण्यासाठी असतो असं मानलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology)कोणाच्या पत्रिकेत सूर्याचे स्थान प्रबळ असेल तर, त्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सफलता आणि मान संन्माना सोबत आरोग्य प्राप्त होतं. जर सूर्यांचे स्थान कमजोर असेल, किंवा कुंडलीत सूर्याच्या स्थाना संबंधीत काही दोष असतील तर वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो. ज्यांना सूर्य देवाचे आशीर्वाद पाहिजेत त्यांनी, काही कामं रविवारी चुकूनही करू नये. जाणून घेऊया ही कामं कोणती आहेत. जी रविवारी केली नाही पाहिजेत.
- जर तुम्हाला जीवनात सुख- सौभाग्य आणि आरोग्य पाहिजे तर तुम्ही चुकूनही रविवारी उशीरापर्यंत झोपू नका. रविवारी सूर्योदया नंतर उशीर पर्यंत झोपणाऱ्यांच्या कुंडलीत सूर्याचे स्थान कमजोर होते. त्याने अशुभ फळ प्राप्त होते.
- रविवार सुट्टीचा दिवस असतो अनेक जण यादिवशी आठवड्याभराची कामं उरकण्याचा प्रयत्न करतात. काही लोक यादिवशी हेअर कट आणि शेविंग करतात. पण, ज्योतिषांच्या दृष्टीने रविवारच्या दिवशी असं करणं अशुभ मानलं जातं. रविवारी दाढी केल्याने किंवा केस कापल्याने सूर्याचे स्थान कमजोर होते.
- रविवारच्या दिवशी सूर्य दिवाची कृपादृष्टी मिळविण्यासाठी उपवास ठेवावा असं काही लोक मानतात. यादिवशी उपवास केल्याने तसंच विधीवत सूर्याची पूजा केल्याने सूर्यांचे स्थान प्रबळ होते. पण, हा व्रत पूर्ण करण्यासाठी आणि सूर्या देवाची कृपा मिळविण्यासाठी यादिवशी मिठाचे सेवन करू नका. हा नियम दुर्लिक्षित करणाऱ्याचं रविवारचा व्रत अर्धवट राहतो.
- ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी चुकूनही तेल मालिश करू नका. रविवार सूर्य देवाचा वार असतो आणि तेल शनी देवाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे रविवारच्या दिवशी तेल मालिश करु नये. गरम पाण्याने अंघोळ करू नये.
- ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याची कृपादृष्टी मिळविण्यासाठी रविवारी मटन, मच्छ खाऊ नये. संभोग करू नये. दूध उतू घालवू नये. सूर्याशी संबंधीत वस्तूंची विक्री करू नये. काळे, नीळे उग्र रंगाचे कपडे वापरू नये.
(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. यासंदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.)