Mahabharat : महाभारतात द्रौपदीने दिला होता कुत्र्याला शाप, आजही दिसून येतो त्याचा प्रत्यय

| Updated on: Mar 16, 2023 | 2:39 PM

असे सांगितले आहे की युधिष्ठिर जेव्हा जुगारात सर्वस्व गमावून वनात जात होता, त्यावेळी मैत्रेय ऋषींना त्यांच्या दिव्य दृष्टीने हे कळले होते. मैत्रेयीने पांडवांना सांगितले की द्रौपदीने तिच्या..

Mahabharat : महाभारतात द्रौपदीने दिला होता कुत्र्याला शाप, आजही दिसून येतो त्याचा प्रत्यय
द्रौपदी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : भविष्य पुराणात द्रौपदीबद्दल (Draupadi) सांगितले आहे की ती तिच्या मागील जन्मी गरीब ब्राह्मण होती. ती अतीशय हालाखीच्या परिस्थितीत जंगलात राहायची पण तिच्या चांगल्या कर्मामुळे ती पुढच्या जन्मी पांडवांची (Panchav) राणी झाली. भविष्य पुराणात असे सांगितले आहे की युधिष्ठिर जेव्हा जुगारात सर्वस्व गमावून वनात जात होता, त्यावेळी मैत्रेय ऋषींना त्यांच्या दिव्य दृष्टीने हे कळले होते. मैत्रेयीने पांडवांना सांगितले की द्रौपदीने तिच्या पूर्वजन्मात अशी सत्कृत्ये केली होती की ती जिथे राहते तिथे अन्नपूर्णेप्रमाणे तिचे भांडार भरले जातील. म्हणूनच जंगलात राहून तुम्हाला अन्नधान्याची चिंता कधीच करावी लागणार नाही.

  अन्यथा द्रोपदीला असते चौदा पती

द्रौपदीला तिच्या पाचही पतींना समान प्रेम आणि वागणूक देत असे.  द्रौपदीबद्दल पांडवांमध्ये कधीच वाद झाला. याचे कारण असे मानले जाते की पांडवांनी द्रौपदी कधीही एकाच वेळी पाच भावांसोबत राहणार नाही असा नियम केला होता.

एक भाऊ द्रौपदीसोबत एक वर्ष राहायचा, त्यानंतर द्रौपदी दुसऱ्या भावाकडे राहायची. या क्रमात द्रौपदी पाच भावांसोबत राहत होती. यामध्ये असाही नियम होता की जेव्हा एक भाऊ द्रौपदीसोबत राहायचा तेव्हा दुसऱ्या भावांना द्रौपदीच्या खोलीत जाण्यास बंदी होती. जो कोणी या नियमाचे उल्लंघन करेल त्याला एक वर्ष जंगलात राहावे लागेल. या नियमामुळे द्रौपदीला  तिच्या सर्व पतींवर समान प्रेम करता आले आणि भावांमध्ये कोणताही वाद झाला नाही.

हे सुद्धा वाचा

द्रौपदीने कुत्र्याला दिलेला हा शाप आजही पाहायला मिळतो

एकदा युधिष्ठिर दौपदीसोबत खोलीत होता. त्याचे बूट खोलीबाहेर ठेवले होते. मात्र दुर्दैवाने एक कुत्र्याने त्या बुटांना पळवून नेले त्याच वेळी एका गुन्हेगाराचा पाठलाग करताना अर्जुनाने द्रौपदीच्या खोलीत प्रवेश केला. बाहेर युधिष्ठिराचे बुट असते तर अर्जुनाने आत प्रवेश केला नसता. या गुन्ह्यामुळे अर्जुनाला वर्षभर जंगलात जावे लागले.

जेव्हा द्रौपदीला कळले की हे सर्व एका कुत्र्यामुळे घडले आहे, तेव्हा द्रौपदीने कुत्र्याला शाप दिला की जेव्हा जेव्हा तो प्रणय करेल तेव्हा त्याला चारचौघात लाजिरवाणे व्हावे लागेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)