Vastu Tips: देवघरात कुठल्या दिशेला असावी श्रीगणेशाची मूर्ती, देवघराबद्दल वास्तुशास्त्र काय सांगते?

| Updated on: Sep 05, 2022 | 11:14 AM

धार्मिक मान्यतेनुसार गणपतीला ज्ञानाची आणि विद्येची देवता मानली जाते आणि देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते. त्यामुळे दोघांनाही देवघरात एकत्र ठेवले जाते. 

Vastu Tips: देवघरात कुठल्या दिशेला असावी श्रीगणेशाची मूर्ती, देवघराबद्दल वास्तुशास्त्र काय सांगते?
गणपती
Image Credit source: Social Media
Follow us on

वास्तुशास्त्रानुसार (Vastu shastra) गणेश-लक्ष्मीची मूर्ती शुभ प्रतीक मानली जाते. त्यामुळे त्यांना योग्य दिशेने स्थापित करण्याला वास्तुशास्त्रात  विशेष महत्त्व आहे. देवघरात गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास विशेष लाभ आणि धनप्राप्ती होते, असे शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे. वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips For Mandir) गणपतीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणं उत्तम मानलं जातं याबद्दल जाणून घेऊया.

सोबत ठेवा गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती

धार्मिक मान्यतेनुसार  गणपतीला ज्ञानाची आणि विद्येची देवता मानली जाते आणि देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते. त्यामुळे दोघांनाही देवघरात एकत्र ठेवले जाते.  जर एखाद्या व्यक्तीकडे ज्ञान नसेल तर तो पैशाचा वापर चुकीच्या पद्धतीने करू शकतो, म्हणून लक्ष्मी म्हणजेच पैशांसोबतच बुद्धीही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे देवघरात गणपती आणि   लक्ष्मीला एकत्र ठेवले जाते. वास्तुशास्त्रानुसार देवघरात गणपतीची मूर्ती  उत्तर दिशेला ठेवावी.

ही चूक टाळा

अनेकदा नकळत लक्ष्मीची मूर्ती गणपतीच्या डाव्या बाजूला ठेवण्यात येते. हे चुकीचे आहे, कारण  पुरुषांच्या डाव्याबाजूला त्यांच्या पत्नीचे स्थान असते. लक्ष्मी ही गणपतीची पत्नी नसल्यामुळे तिला गणपतीच्या डाव्या बाजूला ठेऊ नये.

हे सुद्धा वाचा

घरात जागा कमी असल्यास हे करा

घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास स्वयंपाक घरात ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. वास्तुशास्त्रानुसार देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) कोपऱ्यातून बाहेर जाते.

देवघरात जास्त मोठ्या मूर्ती (प्रतिमा) नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेऊ नये, जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकराएवढे असावे. देवघरात एकच शिवलिंग ठेवावे. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य सांगितले आहे. इतर देवी-देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात. जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात, परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्याच मूर्ती श्रेष्ठ मानण्यात आली आहे.

घरात सूर्यप्रकाश येणे आवश्यक

घरामध्ये देवघर अशाठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते. ज्या ठिकणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल-बूट घेऊन जाऊ नये. देवघरात मृतक आणि पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पुजेशी संबंधित सामानच ठेवावे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)