मुलीच्या सासरी पाणी पिणेही मोठं पाप असतं का? प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

| Updated on: Feb 10, 2025 | 6:35 PM

मुलीच्या सासरी तिच्या घरच्यांनी पाणी पिणेही पाप मानले जाते का? अशी प्रथा पूर्वी प्रचंड प्रमाणात पाळली जायची. मात्र आता ही प्रथा कोणीही पाळत नाही. पण खरंच मुलीच्या सासरी खरंच मुलीच्या आई-वडिलांनी पाणी पिणेही पाप असतं का? यावर प्रेमानंद महाराज यांनी काय उत्तर दिलं ते पाहुयात.

मुलीच्या सासरी पाणी पिणेही मोठं पाप असतं का? प्रेमानंद महाराज काय म्हणाले?
Follow us on

वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांची ख्याती जगभर आहे. यांना सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजणच फार मानतात. प्रेमानंद महाराज त्यांच्या प्रवचनांद्वारे लोकांना मार्गदर्शन करत असतात. महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आणि सत्संगात सहभागी होण्यासाठी लोक दूरदूरून येथे येतात. अनेकजण सत्संगात महाराजांना त्यांना पडलेले प्रश्न विचारतात ज्यांची उत्तरे प्रेमानंदजी भक्तांना अगदी सहजपणे सांगतात.

त्याचप्रमाणे, एका सत्संगादरम्यान, एका महिलेने प्रेमानंदजी महाराजांना असाच एक प्रश्न विचारला की, मुलीच्या लग्नानंतर तिच्या आईवडिलांनी तिच्या घरातील पाणी पिणे ही पाप असते असं म्हटलं जातं. तर खरंच हे असं आहे का? यावर महाराजांनी त्या महिलेला काय उत्तर दिले ते पाहुयात.

मुलीच्या सासरी तिच्या घरचे पाणीही पिणे पाप असतं का?

सत्संगादरम्यान, एका महिलेने प्रेमानंद जी महाराजांना विचारलं की, त्यांच्या मुलीच्या सासरी गेल्यावर तिच्या घरचे पाणी पिणे पाप असल्याचं पूर्वीपासून म्हटलं जातं. मग याच आधार एका महिलेन हा प्रश्न महाराजांना विचारला?

तसेच महिलेने पुढे सांगितले की तिच्या आईची तब्येत बहुतेक वेळा खराब असते आणि तिला तिच्या आईला तिच्या घरी म्हणजे तिच्या सासरी ठेवून तिची सेवा करायची आहे. पण तिच्या सासरच्या मंडळींच्या भीतीमुळे ती त्यांना सोबत ठेवू शकत नाही.  तिचे पालकांचेही असंच म्हणणं आहेकी लेकीच्या घरी जाऊन राहणे तर दूर पण तिच्या घरी पाणी पिणेही पाप असतं. पुढे ती महिला म्हणाली, महाराजजी, कृपया मला सांगा की या परिस्थितीत काय करावे. यावर प्रेमानंजजी महाराज यांनी तिला योग्य ते उत्तर दिलं आहे.

प्रेमानंद जी महाराजांनी काय दिलं उत्तर

महिलेच्या प्रश्नाचे उत्तर देताना प्रेमानंदजी महाराज म्हणाले की “सध्याच्या काळात मुलगा आणि मुलगी यात कोणताही फरक नाही; आईवडिलांचा मुलीवर आणि मुलावर समान हक्क आहे.” एवढेच नाही तर महाराजांनी शास्त्रांचे उदाहरण देत सांगितले की, “आपल्या शास्त्रांमध्येही मुलगा आणि मुलगी असा कोणताही भेदभाव केलेला नाही. म्हणून दोघांनाही त्यांच्या पालकांबाबत समान अधिकार आहेत. पुढे प्रेमानंद जी महाराज म्हणतात की, “जर पालकांची तब्येत खराब असेल तर अशा वेळी मुलगी तिच्या पालकांची सेवा करू शकते, अशा परिस्थितीत जर पालक त्यांच्या मुलीच्या घरी राहत असतील तर त्यात काहीही गैर नाही. मुलगी तिच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकते.”

पूर्वी मुलीच्या सासरी पाणी पिणेही पाप का मानायचे?

प्रेमानंद जी महाराजांनी पुढे सांगितले “सनातन धर्मात महिलांचे पूजनीय स्वरूप असल्याने, लोक मुलीच्या घरी पाणी पिणे पाप मानतात. पण आजच्या काळात या गोष्टींचा विचार योग्य मानला जात नाही.” तर अशा प्रकारे प्रेमानंद जी महाराज यांनी मुलीच्या सासरी पाणी पिणेही पाप का मानायाचे याचं पूर्वापारपासून चालत आलेलं कारण सांगितलं आहे. सोबतच सध्याच्या काळ बदलला असून मुलगा आणि मुलगी हे समानच आहेत आणि मुलीचे पालक मुलीच्या घरी जाऊन राहू शकतात. आता या सर्व प्रथा कोणी पाळत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)