देवाच्या मूर्तीवर वाहिलेलं फूल खाली पडणं शुभ की अशुभ? काय असतो संकेत? पाहा शास्त्र काय सागंते

| Updated on: Nov 11, 2024 | 7:17 PM

हिंदू धर्मात पूजा अथवा प्रार्थना करताना देवाच्या मूर्तीवर फुलं वाहिले जातात, मात्र काही वेळा हे फूल मूर्तीवरून खाली पडते, जाणून घेऊयात त्यामागे नेमका काय संकेत असतो.

देवाच्या मूर्तीवर वाहिलेलं फूल खाली पडणं शुभ की अशुभ? काय असतो संकेत? पाहा शास्त्र काय सागंते
Follow us on

हिंदू धर्मात पूजा अथवा प्रार्थना करताना देवाच्या मूर्तीवर फुलं वाहिले जातात, हिंदू धर्मात फुलांना खूप महत्त्व आहे.मंदिरात असलेल्या देवांच्या मूर्तींवर किंवा आपल्या घरात असलेल्या देवघरातील देवांच्या मूर्तींवर दररोज मोठ्या भक्ती भावानं फुलं वाहिले जातात. मात्र काहीवेळेला तुम्ही देवाच्या मूर्तीवर वाहिलेलं फुलं किंवा फुलांचा हार खाली पडतो. जेव्हा देवाला वाहिलेलं फुल किंवा हार खाली पडतो तेव्हा आपल्या मनात अनेक विचार येतात. देवाच्या मूर्तीवर वाहिलेलं फुल किंवा हार जर खाली पडला तर अनेक लोक याला एक शुभ संकेत मानतात. तर काही लोक याला अशुभ संकेत मानतात. मात्र शास्त्र या संदर्भात काय सांगतं? याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

फुल खाली पडण्याचा अर्थ

ज्योतिष शास्त्रानुसार तुम्ही देवाला वाहिलेलं फूलं किंवा फुलांचा हार खाली पडणं हा एक प्रकारचा संकेत असून शकतो मात्र हा शुभ संकेत आहे की अशुभ हे पूर्णपणे त्या वर्तमान स्थितीवर अवलंबून आहे.

देवाचा संदेश

देवाच्या मूर्तीवर वाहिलेलं फुल जर खाली पडलं तर याला देवानं पाठवलेला संकेत देखील म्हटलं जातं. मूर्तीवरून खाली पडलेलं हे फुल असा संकेत देतं की ईश्वर तुमच्या भक्तीला पाहात आहे, तुम्ही देवाकडे जे मागितलं आहे, ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत.

दुसरीकडे असं देखील मानलं जातं की तुम्ही देवाच्या मूर्तीवर वाहिलेलं फूल खाली पडणं हे एखाद्या अशुभ संकेताचं लक्षण असू शकतं. तुमच्यावर जर एखादं संकट येणार असेल तर तुम्हाला त्याबाबत सावधान करण्यासाठी म्हणून तो एक ईश्वरी संकेत असतो, तुम्ही जो निर्णय घेणार असाल त्या निर्णयाबाबत तुम्ही पून्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे, असा तो संदेश असतो.

वेळ आणि स्थान

शास्त्रानुसार तुम्ही देवाला वाहिलेलं फूल जर खाली पडलं तर ते या गोष्टीचा देखील संकेत असून शकतो की तुम्ही चुकीच्या वेळी देवाची पूजा करत आहात, अथवा तुम्ही ज्या स्थानी देवाची पूजा करत आहात ते स्थान चुकीचं आहे.त्यामुळे शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ दिलेली आहे.