हिंदू धर्मातील प्रथांनुसार घरामध्ये विविध प्रकारचे वृक्ष, वनस्पती लावणं शुभं मानलं जातं. तसेच काही वनस्पती या घरात असणं अशुभ देखील मानलं जातं.यामध्ये वडाच्या झाडाचा देखील समावेश होतो.हिंदू धर्म शास्त्रानुसार घरात वडाचं झाड असणं हे शुभ मानलं जातं. मात्र काही लोक हे झाड आपल्या घरात लावत नाहीत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वडाचं रोपटं जेव्हा वृक्ष बनतो तेव्हा त्याचा आकार प्रचंड वाढतो. वडाच्या झाडाच्या मुळ्या खोलवर जातात, त्यामुळे त्याचा घराला धोका देखील निर्माण होऊ शकतो. हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाला खूप महत्त्व आहे, हे झाडं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे, मात्र वडाचं झाडं घरात न लावता अशा ठिकाणी लावलं जातं, जिथे जास्त रहदारी नसते, जवळपास घर नसते.
हिंदू धर्म शास्त्रानुसार वडाचं झाडं हे अत्यंत शुभ मानलं जातं. मात्र हे झाडं प्रचंड विशाल असतं. हे झाड घरात लावल्यामुळे घराचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे या झाडाला घरात लावलं जातं नाही. प्राचीन काळातील अनेक धर्म ग्रथांमध्ये असे संदर्भ सापडतात की प्राचीन ऋषी मुनींनी वडाच्या झाडाखाली बसूनच तपश्चर्या केली, त्यांना तिथेच ज्ञान प्राप्ती झाली. त्यामुळे वडाच्या झाडाला शास्त्रामध्ये कुठही अशुभ मानलं गेलेलं नाही. वडाच्या झाडाकडे दीर्घ आयुष्याचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं.वट पौर्णिमेला महिला या झाडाची पूजा करतात.
वडाच्या झाडाचं धार्मिक महत्त्व
हिंदू धर्मात वडाच्या झाडाचं अत्यंत महत्त्व आहे. या झाडाची पूजा केली जाते. वडाच्या झाडाला वट वृक्ष किंवा अक्षयवट या नावानं देखील ओळखलं जातं.वडाच्या झाडामध्ये त्रीदेव ब्रम्ह, विष्णू आणि महेश यांचा वास असल्याचं मानलं जातं. हे झाडं दीर्घकाळ टीकतं त्यामुळे दीर्घायुष्याचं प्रतीक म्हणून देखील या झाडाकडे बघितलं जातं. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की लग्न झालेल्या स्त्रीने जर वडाची पूजा केली तर तिला अखंड सौभाग्यवतीचं वरदान प्राप्त होतं. तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभतं.