Jaganaath Rath Yatra 2023 : जगन्नाथ रथ यात्रा का काढली जाते? यात्रे संबंधीत ही आहे दुर्मिळ माहिती

| Updated on: Jun 23, 2023 | 10:39 AM

या यात्रेत सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येतात. ओरिसाचे जगन्नाथ मंदिर हे चार पवित्र स्थानांपैकी एक आहे. येथे श्री कृष्णासह श्री हरी विष्णूचा आठवा अवतार, त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची पूजा केली जाते.

Jaganaath Rath Yatra 2023 : जगन्नाथ रथ यात्रा का काढली जाते? यात्रे संबंधीत ही आहे दुर्मिळ माहिती
जगन्नथ रथ यात्रा
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला (Jaganaath Rath Yatra 2023) 20 जूनपासून सुरुवात झाली आहे. जगन्नाथाचे मुख्य मंदिर ओडिशाची पुरी आहे, जी पुरुषोत्तम पुरी म्हणूनही ओळखली जाते. राधा आणि श्री कृष्णाच्या युगल मूर्तीचे प्रतीक स्वतः श्री जगन्नाथ आहेत. ओरिसामध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या अर्धाकृती मूर्ती स्थापित केल्या आहेत, ज्या इंद्रद्युम्न राजाने बांधल्या होत्या. भगवान जगन्नाथाची रथयात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेला जगन्नाथ पुरी येथे सुरू होते आणि दशमी तिथीला समाप्त होते. रथयात्रेच्या अग्रभागी ताल ध्वजावर श्री बलराम, त्यांच्या मागे माता सुभद्रा आणि पद्मध्वजाच्या रथावर सुदर्शन चक्र आहे. शेवटी श्री जगन्नाथ गरुड ध्वजावर नंदीघोष नावाच्या रथावर आहेत.

रथयात्रेचे विशेष महत्त्व

हिंदू धर्मग्रंथानुसार, भगवान जगन्नाथ आपला भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासह रथयात्रेदरम्यान आपल्या मावशीच्या घरी जातात. यामुळे पुरीच्या जगन्नाथ मंदिरातून 3 रथ निघतात. स्कंद पुराणानुसार जो माणूस रथयात्रेत श्री जगन्नाथजींचे नामस्मरण करत गुंडीचा नगरी पोहोचतो तो पुनर्जन्माच्या बंधनातून मुक्त होतो. जी व्यक्ती भगवंताच्या नामस्मरणात रथयात्रेत सहभागी होतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. फक्त रथयात्रेत सहभागी झाल्याने मुलांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

जगन्नाथजींचा महाप्रसाद

जगन्नाथजींना दिवसातून सहा वेळा महाप्रसाद दिला जातो. सात वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ, चार प्रकारची मसूर, नऊ प्रकारच्या भाज्या आणि अनेक प्रकारचे मिठ्ठान्न नैवेद्यात दिले जाते. गोड पदार्थ तयार करण्यासाठी साखरेऐवजी चांगल्या प्रतीचा गूळ वापरला जातो. मंदिरात बटाटा, टोमॅटो आणि फ्लॉवरचा वापर करण्यास मनाई आहे.

हे सुद्धा वाचा

घरी भगवान जगन्नाथाची पूजा कशी करावी?

घरातील जगन्नथ श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची प्रतिकृती स्थापित करा. त्यांना सात्विक नैवेद्य अर्पण करा. नैवेद्यावर तुळशीची पाने जरूर ठेवा. यानंतर श्री जगन्नाथाचे स्तुती स्तोत्र पठण करा किंवा हरिनाम महामंत्राचा जप करा. या दिवशी घरात पूर्ण पवित्रता ठेवा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)