नवीन वर्षात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडणार आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचक. नव्या वर्षात पंचकाची सुरूवात होणार आहे. प्रत्येक महिन्यात पाच दिवस असे असतात की त्यावेळी कोणतंच शुभ काम केलं जात नाही. याच दिवसांना पंचक असं म्हटलं जातं. ज्योतिषांच्या अनुसार, चंद्र जेव्हा कुंभ आणि मीन राशीत असतो, त्यावेळेला पंचक असं म्हटलं जातं. चंद्र जेव्हा कुंभ आणि मीन राशीत पाच दिवस राहतो. पंचक पाच प्रकारचे असतात. रोग पंचक, राज पंचक, अग्नी पंचक, चोर पंचक आणि मृत्यू पंचक. धार्मिकदृष्ट्या पंचकाच्या पाच दिवस कोणतंही शुभ काम करण्यास मनाई असते.
2025मध्ये जानेवारीतच पंचकाची सुरुवात होणार आहे. पंचकाच्या काळात चंद्र पाच नक्षत्रांकडून जातो. त्यामुळेच त्याला शुभ मानलं जात नाही. जानेवारीत पंचक कधी लागतो याचीच माहिती आपण घेणार आहोत. नव्या वर्षातील पहिल्या महिन्यातील कोणत्या पाच दिवशी शुभ कार्य करायचे नसते याची माहिती घेणार आहोत.
यंदा 2025मध्ये जानेवारी महिन्यात पंचकाची सुरुवात 3 जानेवारी 2025 पासून होणार आहे. या पंचकाची समाप्ती 7 जानेवारी 2025 रोजी होईल. हे पंचक 3 जानेवारी सकाळी 11.55 मिनिटाने सुरू होईल. तर 7 जानेवारी रोजी संध्याकाळी 5.44 वाजता संपेल.
जानेवारी पंचकाची सुरुवात शुक्रवारपासून होणार आहे. त्यामुळेच त्याला चोर पंचक असं म्हटलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्रवारी सुरू होणारा चोर पंचक सर्वात अशुभ पंचक असतो. या काळात कोणतंही काम करू नये. असं केल्याने त्याचा आयुष्यावर चुकीचा प्रभाव पडतो. चोर पंचकामुळे व्यक्तीला शारीरिक नुकसान होण्याची भीती असते.
पंचक पाच प्रकारचे असतात. रोग पंचक, राज पंचक, अग्नी पंचक, चोर पंचक, मृत्यु पंचक असे पाच प्रकारचे पंचक असतात.
रविवार सुरु होणाऱ्या पंचकाला रोग पंचक म्हणतात
सोमवारी सुरू होणाऱ्या पंचकाला राज पंचक म्हणतात
मंगळवारी सुरू होणाऱ्या पंचकाला अग्नी पंचक म्हणतात
शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकाला चोर पंचक म्हणतात
शनिवारी सुरू होणाऱ्या पंचकालला मृत्यू पंचक म्हणतात
चोर पंचकाच्या दिवशी ही कामे करण्यापासून दूर राहा:-
चोर पंचकात आर्थिक देवाणघेवाण करू नका
व्यापार आणि बिझनेसशी संबंधित कामे करू नका
प्रवास करू नका
लग्न, मुंडन, गृह प्रवेश करू नका, कोणतंही नवं काम करू नका
नवीन घर किंवा दुकान खरेदी करू नका
नवीन वाहन खरेदी करू नका
चोर पंचकात व्यापार आणि आर्थिक घेवाणदेवान करण्यासापासून थोडं सतर्क राहिलं पाहिजे. नाही तर आर्थिक हानी होणार आहे. चोर पंचकाच्यावेळी आर्थिक हानी होण्याबरोबरच चोरी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच या काळात सांभाळून राहिलं पाहिजे. चोर पंचकाच्या काळात कोणत्याही प्रकारचे व्यवसाय सुरू करू नका.