हिंदू दिनदर्शिकेनुसार (Hindu calendar) 8 जुलैनंतर विवाह (July Marriage muhurat) मुहूर्त संपणार आहे. यानंतर शुभ कार्यासाठी नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, कारण यानंतर चातुर्मास सुरु होणार आहे. देवशयनी एकादशी (Devashyani Ekadashi 2022) 10 जुलै रोजी आहे. या तिथीला भगवान विष्णू चार महिने योगनिद्रात जातात. त्यामुळे या चार महिन्यांत कोणतेही शुभ कार्य करणे हिंदू धर्मात निषिद्ध आहे. यानंतर देवूठाणी एकादशीला शुभ मुहूर्त सुरू होतो. तुम्हाला कोणतेही शुभ कार्य करायचे असल्यास ते 9 जुलैपूर्वी करू शकता. या चार महिन्यांत कोणते शुभ कार्य केले जात नाही आणि कोणत्या दिवसापासून शुभ काम सुरू होईल हे जाणून घेऊया.
जुलै- 3, 5, 6, 8
नोव्हेंबर- 21, 24, 25, 27
डिसेंबर- 2, 7, 8, 9, 14
10 जुलै 2022 पासून देवशयनी एकादशीला भगवान विष्णू झोपी जातील. 4 नोव्हेंबर 2022 रोजी देवूठाणी एकादशीला देव क्षीर झोपेतून जागे होतील. चातुर्मास सुरू झाल्यानंतर विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, मुंडन, जनेऊ संस्कार आणि इतर शुभ कार्ये होत नाहीत. सूर्यदेवाला प्रत्यक्ष देवता मानले जाते. जेव्हा दक्षिणायन असते तेव्हा सूर्यदेव दक्षिणेकडे झुकत असतो. यामुळेच या काळात मांगलिक कार्यास मनाई आहे.
मान्यतेनुसार दक्षिणायन काळ ही देवतांची रात्र मानली जाते. दक्षिणायन हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते आणि उत्तरायण हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. दक्षिणायनमध्ये सूर्य देव कर्क ते मकर राशीपर्यंत सहा राशींमधून जातो. या दरम्यान पितरांची पूजा आणि स्नानाचे खूप महत्त्व आहे. दक्षिणायन काळात उपवास करणे, उपासना करणे आणि तांत्रिक साधने करणे हे फलदायी मानले जाते. असे म्हटले जाते की, जेव्हा सूर्य पूर्वेकडून दक्षिणेकडे जातो तेव्हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा काळ वाईट असतो. म्हणूनच चातुर्मासात भोजनाकडे विशेष लक्ष द्यावे, असे सांगितले जाते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)