मृत्यू हा प्रत्येकासाठीच अटळ आहे पण आपण अमर असल्यासाच्या अभिर्भावात जीवन जगतो. यामागे मृत्यूचे भय (Fear of death) कारणीभूत आहे. आपला मृत्यू झाला तर काय? या याचा विचार करवीत नाही म्हणूण त्याची चर्चा करणेही टाळतो. तर दुसरीकडे मृत्यूबद्दल अनेकांच्या मनात काही प्रश्न असतात. मृत्यू समीप आल्यानंतर नेमके काय दिसते? ( What happened exactly before death) कोणत्या गोष्टी घडतात? असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला असतील. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती. जन्मापूर्वी 9 महिन्यापर्यंत व्यक्ती गर्भात असतो, त्याच पद्धतीने मृत्यूच्या 9 महिने आधीपासून व्यक्तीच्या शरीरात काही विशिष्ट बदल होतात. अनेकदा हे बदल मृत्यू येण्याचे संकेत देत असतात. ज्याचा मृत्यू समय जवळ येत असतो त्यांच्यासोबत अत्यंत विचित्र घटना घडत असतात, ज्या व्यक्तीला एकदम वेगळा अनुभव देत असतात.
- एखाद्या व्यक्तीला चंद्र, सूर्य आणि अग्नीचा प्रकाश पाहण्यास असमर्थता जाणवू लागते. हा संकेत असतो तो म्हणजे आयुष्यातील काही वेळ शिल्लक आहे. असं मानलं जातं की, मृत्यू जवळ आल्यानंतर व्यक्ती चंद्र आणि सूर्य सामान्यपणे पाहू शकत नाही.
- शिवपुराणा नमूद केल्याप्रमाणे, मृत्यूच्या काही महिने अगोदर माणसाची जीभ नीट काम करणं बंद करते. यामुळे त्या व्यक्तीला जेवणाची योग्य चव मिळत नाही. शिवाय बोलण्यासही त्रास जाणवतो.
- शिवपुराणानुसार , जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा रंग फिकट पिवळा किंवा पांढरा होऊ लागतो. हे संकेत आहेत ते म्हणजे, त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे.
- जर एखाद्या व्यक्तीला सावली दिसत नसेल तर तो मृत्यूचा संकेत मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी एखाद्या वृद्ध व्यक्तीला सावली दिसत नाही तेव्हा त्या व्यक्तीचा लवकरच मृत्यू होतो.
- ज्योतिषशास्त्रात नमूद केल्यानुसार, ज्या व्यक्तीला तोंड, जीभ, डोळे, कान आणि नाक दगडासारखे जाणवू लागतात, तर समजावे कि त्याचा काळ जवळ आला आहे.
- एखादी गेलेली व्यक्ती बोलवत असल्याचा भास होतो. तसेच ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्यालासुद्धा त्याच्या जवळ जाण्याची इच्छा होते.
- जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिला मुंग्या लागू शकतात. या मुंग्या लाल रंगाच्या असतील तर समजून जावे की मृत्यू समय निकट आलेला आहे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)