Kalaram Mandir Nasik : ऐतिहासीक आहे नाशिकचे काळाराम मंदिर, श्रीरामाशी आहे जवळचा संबंध

| Updated on: Jan 12, 2024 | 10:08 PM

धार्मिक कथांनुसार, प्रभू श्रीराम वनवासात पंचवटीत राहिले तेव्हा ऋषीमुनींनी त्यांना राक्षसांच्या प्रकोपातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना केली. श्रीरामांनी त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि कृष्णरूप धारण करून ऋषीमुनींना राक्षसांच्या प्रकोपातून मुक्त केले. काळाराम मंदिरात श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण यांची काळ्या पाषाणापासून बनलेली उभी मूर्ती आहे. 

Kalaram Mandir Nasik : ऐतिहासीक आहे नाशिकचे काळाराम मंदिर, श्रीरामाशी आहे जवळचा संबंध
काळाराम मंदिर
Image Credit source: Social Media
Follow us on

नाशिक : 22 जानेवारीला अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या  अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. अभिषेकची तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, पीएम मोदींनी अभिषेक करण्यापूर्वी 11 दिवस चालणाऱ्या विधीला सुरुवात केली आहे. नाशिकच्या पंचवटीपासून या विधीला सुरुवात झाली आहे. याआधी पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिराला (Kalaram Mandir) भेट दिली होती. आज आम्ही तुम्हाला प्रभू रामाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणजे काळाराम मंदिराविषयी सांगणार आहोत.

असे आहे या मंदिराचे वैशिष्ट्य

काळाराम मंदिर हे भगवान श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता यांना समर्पित प्राचीन मंदिर आहे. हे नाशिक पंचवटीजवळ आहे. हे मंदिर 1782 मध्ये बांधण्यात आले होते. हे मंदिर सुरुवातीला लाकडाचे होते आणि त्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी 12 वर्षे लागली. या मंदिराभोवती 17 फूट उंच भिंती असून संपूर्ण मंदिर परिसर 245 फूट लांब आणि 105 फूट रुंद आहे. हे मंदिर भगवान श्री रामाच्या सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक आहे.

श्रीरामांनी त्यांचा बहुतांश काळ या भागात वनवासात घालवला

असे मानले जाते की वनवासाच्या काळात भगवान श्रीरामांनी त्यांचा बहुतेक वेळ पंचवटीत माता सीता आणि लक्ष्मणासोबत घालवला होता. या ठिकाणच्या अनेक पौराणिक कथा आहेत. चला जाणून घेऊया काळाराम मंदिराशी संबंधित कथा.

हे सुद्धा वाचा

काळाराम मंदिराशी संबंधित कथा

धार्मिक कथांनुसार, प्रभू श्रीराम वनवासात पंचवटीत राहिले तेव्हा ऋषीमुनींनी त्यांना राक्षसांच्या प्रकोपातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना केली. श्रीरामांनी त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि कृष्णरूप धारण करून ऋषीमुनींना राक्षसांच्या प्रकोपातून मुक्त केले. काळाराम मंदिरात श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण यांची काळ्या पाषाणापासून बनलेली उभी मूर्ती आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)