मुंबई, दर महिन्याला कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी व्रत (Kalashtami) केले जाते. कालाष्टमी व्रतामध्ये भगवान शिवाच्या भैरव रूपाची पूजा केली जाते. धार्मिक ग्रंथानुसार भैरवाची तीन रूपे आहेत – काल भैरव, बटुक भैरव आणि रुरु भैरव. या दिवशी त्यांच्या कालभैरव रूपाची पूजा करण्याचा नियम आहे. असे मानले जाते की यामुळे जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात.
पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 09:29 पासून सुरू होईल आणि दुसर्या दिवशी, 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:57 वाजता समाप्त होईल. 17 ऑक्टोबर रोजी कालाष्टमी व्रत पाळण्यात येणार असून मंगळवारी 18 ऑक्टोबर रोजी पारण केले जाणार आहे.
कार्तिक महिन्यातील अष्टमी तिथीला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. घरामध्ये कालाष्टमी व्रताची पूजा करायची असल्यास घरातील पूजेच्या ठिकाणी काळ्या वस्त्रावर पार्वती आणि गणेशाची मूर्ती बसवावी.
विधिवत पूजा करावी. पूजेच्या दिवशी कालभैरवाला पूजा साहित्य अर्पण करून दिवा लावावा. आता खालीलपैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करा. त्यानंतर आरती करावी. असे मानले जाते की याद्वारे सर्व भय दूर करणारे बाबा कालभैरवाचे आशीर्वाद प्राप्त होतात. घर संपत्तीने भरलेले असेल.
शिवपुराणानुसार कालाष्टमी व्रतामध्ये कालभैरवाच्या पूजेदरम्यान या मंत्रांचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
मंत्र:
अतिक्रूर महाकाय कल्पान्त दहनोपम्, भैरव नमस्तुभ्यं अनुज्ञा दातुमर्हसि!!
इतर मंत्र:
ओम भयहारम् च भैरव:।
ओम कालभैरवाय नमः ।
ओम ह्रीं बम बटुकाय आपदुद्धरणाय कुरुकुरु बटुकाय हर्यम्.
ॐ भ्राम काळभैरवई फुट ।