मुंबई : दर महिन्याला कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते. कालभैरवाचे (Kalbhairav) भक्त वर्षातील सर्व कालाष्टमीच्या दिवशी त्यांची पूजा करतात आणि उपवास करतात. पंचांगानुसार, अधिरमासातील कालाष्टमी 8 ऑगस्ट, मंगळवारी म्हणजे आज आहे. अधिक महिन्यात कालाष्टमीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया. आध्स कालाष्टमी 2023 कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, अष्टमी तिथी 08 ऑगस्ट रोजी येत आहे. अधिकमासाची कालाष्टमी तीन वर्षांतून एकदा येते. या दिवशी मासिक कालाष्टमी व्रत केले जाते. या विशेष दिवशी भगवान शिवाच्या रुद्रावतार काल भैरवाची पूजा केली जाते.
कालाष्टमीच्या दिवशी भगवान शिवाच्या रुद्रावतार कालभैरवाची पूजा केली जाते. काल भैरव हे तंत्रमात्राचे देवता म्हणूनही ओळखले जाते. असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीला अकाली मृत्यू आणि अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते. यासोबतच कालाष्टमीचे व्रत करून शनि आणि राहूच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळू शकते. कालाष्टमीला निशिता मुहूर्तावर कालभैरवाची पूजा मंत्र सिद्धीसाठी केली जाते.
पंचांगानुसार, अधिकमासची अष्टमी तिथी 08 ऑगस्ट 2023 रोजी पहाटे 04.14 वाजता सुरू होईल आणि दुसर्या दिवशी 09 ऑगस्ट 2023 रोजी पहाटे 03.52 पर्यंत चालू राहील. अशा स्थितीत 8 ऑगस्ट रोजी कालाष्टमी उपवास करण्यात येणार आहे.
निशिता काल मुहूर्त – सकाळी 12.22 ते दुसऱ्या दिवशी 01.06 पर्यंत
या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे घाला. यानंतर देवघरासमोर चौरंगावर स्वच्छ कापड पसरून बाबा कालभैरवाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. यानंतर भगवान शिव आणि गणेशाची प्रतिष्ठापना करा. बाबा भैरवनाथांना फुले, अक्षत, हार, पान, उदबत्ती, दिवा इत्यादी अर्पण करा. कालभैरवाला इमरतीचा नैवेद्य दाखवा. पान वगैरे अर्पण करा. निशिता काल मुहूर्तावर बाबा काल भैरवाची पूजा केली जाते. परंतु गृहस्थ या दिवशी बेलपत्रावर लाल चंदनाने ‘ओम’ लिहून शिवलिंगावर अर्पण करू शकतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)