Kamda Ekadashi 2023 : आज कामदा एकादशी, या उपायांनी होतील सर्व इच्छा पूर्ण

| Updated on: Apr 01, 2023 | 9:13 AM

असे म्हटले जाते की या दिवशी व्रत केल्याने माणसाचे सर्व दु:ख दूर होतात. यासोबतच कामदा एकादशीचे व्रत आणि पूजा केल्याने भगवान विष्णू व्यक्तीच्या जीवनातील सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करतात.

Kamda Ekadashi 2023 : आज कामदा एकादशी, या उपायांनी होतील सर्व इच्छा पूर्ण
एकादशी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : सनातन धर्मात प्रत्येक एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी व्रताची मुख्य देवता म्हणजे भगवान विष्णू, कृष्ण किंवा त्यांचे अवतार ज्यांची या दिवशी पूजा केली जाते. चैत्र महिन्यातील एकादशी व्रताचे विशेष महत्त्व असून त्यामुळे मन आणि शरीर दोन्ही संतुलित राहतात. यापैकी एक म्हणजे कामदा एकादशी. (Kamda Ekadashi 2023) असे म्हटले जाते की या दिवशी व्रत केल्याने माणसाचे सर्व दु:ख दूर होतात. यासोबतच कामदा एकादशीचे व्रत आणि पूजा केल्याने भगवान विष्णू व्यक्तीच्या जीवनातील सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करतात. यामुळेच या एकादशीचे एक नाव फलदा एकादशी देखील आहे. यावेळी कामदा एकादशीचे व्रत 01 एप्रिल म्हणजेच आज पाळले जात आहे.

कामदा एकादशी शुभ मुहूर्त

शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कामदा एकादशी व्रत केले जाते. कामदा एकादशी 01 एप्रिल रोजी म्हणजेच आज रात्री 01:58 वाजता सुरू झाली आहे आणि 02 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या पहाटे 04:19 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार कामदा एकादशी 01 एप्रिललाच साजरी केली जाईल. कामदा एकादशीचे पारण 02 एप्रिल रोजी दुपारी 01:40 ते संध्याकाळी 04:10 पर्यंत असेल.

कामदा एकादशीची पूजा पद्धत

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून प्रथम सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी. त्यांना पिवळी फुले, पंचामृत आणि तुळशीची पाने अर्पण करा. यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करा आणि त्यांच्या मंत्रांचा जप करा. या दिवशी फलाहार करा, यामुळे तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील. जर तुम्ही फक्त एका वेळ उपवास करत असाल तर दुसऱ्या वेळेत वैष्णव भोजन म्हणजेच कांदा लसून नसलेले भोजन करा. दुसऱ्या दिवशी सकाळी एका वेळचे अन्न किंवा धान्य एखाद्या गरीबाला दान करावे. या दिवशी परमेश्वराचे नाम स्मरण करा.

हे सुद्धा वाचा

कामदा एकादशीच्या दिवशी सुख आणि समृद्धीसाठी उपाय

1. जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसमोर हळदीच्या दोन गाठी अर्पण करा. असे केल्याने तुमची समस्या लवकर दूर होईल.

2. कामदा एकादशीच्या दिवशी गरजू लोकांना हरभरा डाळ आणि मिठाई दान करा. असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद येईल.

3. जर तुम्हाला जीवनात प्रगती करायची असेल तर कामदा एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा 108 वेळा स्पष्ट जप करा.

4. भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशीच्या पूजेमध्ये भगवान विष्णूला पिवळ्या झेंडूचे फूल अर्पण करा.

5. कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या मंदिरात मोराचे पंख किंवा मुकुट अर्पण करा. असे केल्याने तुमचे दु:ख दूर होतील आणि तुम्हाला सुख-समृद्धी मिळेल.

पापक्षालनासाठी हे उपाय करा

भगवान श्रीकृष्णाला चंदनाची माळ अर्पण करा. यानंतर “क्लीं कृष्ण क्लीं” चा 11 वेळा जप करा. अर्पण केलेली चंदनाची माळ आपल्याजवळ ठेवावी. पापांचे प्रायश्चित्त होईल, पापी प्रवृत्तीपासून मुक्ती मिळेल. तुमची कीर्ती वाढेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)