मुंबई : हिंदू धर्मात लग्नादरम्यान अनेक विधी केले जातात. कन्यादान (Kanyadan) हा देखील यापैकीच एक विधी आहे. धार्मिक शास्त्रात कन्यादान हे श्रेष्ठ दान म्हटले आहे. हिंदू विवाहांमध्ये जयमाला ते कन्यादानापर्यंतच्या प्रत्येक विधीचे वेगवेगळे अर्थ आहेत. लग्न समारंभात आपल्या मुलीचे कन्यादान करणे हा पालकांसाठी भावनिक क्षण असतो. लग्नाच्या वेळी आपल्या मुलीचा हात वराकडे सोपवण्याला कन्यादान म्हणतात. या विधीद्वारे वडील आपल्या मुलीची जबाबदारी तिच्या पतीवर सोपवतात आणि तिला तिच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी आशीर्वाद देतात, परंतु कन्यादान म्हणजे मुलीचे दान नाही हे फार कमी लोकांना माहीत असेल. जाणून घेऊया यामागची एक पौराणिक कथा.
भगवान श्रीकृष्णाने अर्जुन आणि सुभद्रा यांचा गंधर्व विवाह लावला तेव्हा कृष्णाचा मोठा भाऊ बलराम याने त्याला विरोध केला. भगवान बलराम म्हणाले होते की सुभद्राचे कन्यादान झाले नाही आणि लग्नात कन्यादानाचा विधी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा विवाह पूर्ण मानला जाणार नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, मुलीचे दान करण्यासाठी ती कोणता प्राणी नाही. कन्यादानाचा योग्य अर्थ मुलीचे आदान असा आहे, मुलीचे दान नाही. लग्नाच्या वेळी मुलीची जाबाबदारी नवरदेवाच्या हाती सोपवताना वडील सांगतात की, आजपर्यंत मी माझ्या मुलीचे पालनपोषण केले आणि तिची जबाबदारी पार पाडली, आजपासून मी माझी मुलगी तुझ्या स्वाधीन करतो. यानंतर, वधू वधूची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचे वचन नवरा मुलगा देतो. या विधीला मुलीचे आदान प्रदान असे म्हणतात.
या विधीचा अर्थ असा नाही की वडिलांनी मुलगी दान केली आणि आता त्यांचा तिच्यावर आता काहिच अधिकार नाही. देवाणघेवाण किंवा आदान प्रदान म्हणजे घेणे किंवा घेणे. अशा प्रकारे वडील आपल्या मुलीची जबाबदारी वरावर सोपवतात आणि वर त्या जबाबदाऱ्या स्वीकारतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले – मुलगी ही देवाने दिलेली देणगी आहे आणि देवाने दिलेल्या देणगीची दान होत नाही.
हिंदू धर्मग्रंथांनुसार, मुलीची पहिली देवाणघेवाण दक्ष प्रजापतीने केल्याचे सांगितले जाते. दक्ष प्रजापतीला 27 मुली होत्या. ज्याचा विवाह दक्ष प्रजापतीने चंद्रदेवाशी केला होता. जेणेकरून ब्रह्मांड व्यवस्थित चालवता येईल. त्याने आपल्या 27 मुली चंद्रदेवांच्या स्वाधीन करून आपल्या मुलींचे आदान केले. दक्षाच्या या 27 कन्या 27 नक्षत्र मानल्या जातात. मान्यतेनुसार, तेव्हापासून लग्नाच्या वेळी कन्या आदानाची ज्याचा अपभ्रंश होऊन कन्यादानाची प्रथा सुरू झाली.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)