मुंबई : हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. असे म्हटले जाते की या महिन्यात पवित्र नदीत स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व दु:ख आणि क्लेश दूर होतात. शास्त्रातही दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. कार्तिक पौर्णिमेलाही (Kartik Purnima) पवित्र नदीत स्नान केले जाते, म्हणून याला गंगास्नान असेही म्हणतात. फक्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने माणसाचे सर्व दु:ख, संकटे दूर होतात आणि त्या व्यक्तीला श्री हरीची कृपा प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी दीपदानही केले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि घरात धनसंपत्ती वाढते. ज्योतिषी पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेची तिथी, शुभ मुहूर्त आणि स्नान केल्यानंतर कोणत्या वस्तूचे दान करणे फायदेशीर मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार कार्तिक पौर्णिमेला गंगास्नानानंतर दानाचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी जितके जास्त दान केले जाते तितके अधिक भगवान विष्णूचे आशीर्वाद प्राप्त होतात. घरात सुख-समृद्धी नांदते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान केल्याने माणसाची सर्व पाप आणि दुःखे नष्ट होतात असे सांगितले जाते.
पौराणिक कथेनुसार, या दिवशी देव गंगेत स्नान करण्यासाठी पृथ्वीवर येतात. अशा स्थितीत या दिवशी गंगास्नानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने अनेक पुण्य प्राप्त होते. त्याचबरोबर जर तुम्ही गंगेत स्नान करायला जाऊ शकत नसाल तर स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा. यामुळे गंगेत स्नान केल्यासारखेच परिणाम प्राप्त होतील.
ज्योतिष शास्त्रानुसार गंगा स्नानानंतर दिवा दान करणे शुभ मानले जाते. प्रदोष काळात या दिवशी दिवा दान केल्याने भगवान विष्णूसह देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन भक्तांवर विशेष आशीर्वाद देतात. गंगा स्नान केल्यानंतर एखाद्या शुभ मुहूर्तावर नदी किंवा तलावात दिवा दान केल्यास पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरात सुख-शांती नांदते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)