Kartiki Ekadahi 2023 : राज्यभरातील भाविक पंढरपूरात दाखल, विठूमाउलीच्या जय घोषात पंढरी दूमदूमली

| Updated on: Nov 23, 2023 | 8:54 AM

पंढरपूरात कार्तिकी एकादशी निमीत्त भक्तांचा महासागर उसळला आहे. लाखो भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल झाले आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि दर्शन रांगेतील घुसखोरी टाळण्यासाठी तसेच भुरट्या चोऱ्या आणि कोणताही गर्दीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर प्रशासनाने 120 सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येत आहे. 

Kartiki Ekadahi 2023 : राज्यभरातील भाविक पंढरपूरात दाखल, विठूमाउलीच्या जय घोषात पंढरी दूमदूमली
कार्तिकी एकादशी महापूजा
Image Credit source: Social Media
Follow us on

पंढरपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली. गेल्या 3 दिवसांपासून ही तयारी करण्यात आली आहेया वर्षी विठ्ठल मंदिराला एकुण 5 टन फुलांची सजावट केली गेली आहे. साधारण 30 ते 35 कारागीरांनी यासाठी मेहनत घेतली आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने देवेंद्र फडणवीस यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करावी व राज्यातील शेतकरी व कष्टकरी यांना यश द्यावे. राज्यातील प्रत्येकाच्या घरात धनधान्य, सुख-शांती व समृद्धी नांदावी.  तसेच सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याची महाराष्ट्राची परंपरा कायम राहावी, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल चरणी घातले.

पंढरपूरात भक्तांचा महासागर

पंढरपूरात कार्तिकी एकादशी निमीत्त भक्तांचा महासागर उसळला आहे. लाखो भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल झाले आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि दर्शन रांगेतील घुसखोरी टाळण्यासाठी तसेच भुरट्या चोऱ्या आणि कोणताही गर्दीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर प्रशासनाने 120 सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी

कार्तिकी एकादशी निमीत्त पंढरपूरात दाखल होणाऱ्या भाविकांचा प्रशासनातर्फे मोफत आरोग्य तपासणी होणार आहे. तीन दिवस कार्तिकी वारीच्या निमित्ताने येणाऱ्या वारकऱ्यांची महाआरोग्य शिबिरात सर्वरोग निदान तपासणी करण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी औषधोपचार आणि विविध तपासण्या करून गरज असल्यास पुढील शस्त्रक्रियेची सोयसुद्धा मोफत केली जाणार आहे. महाआरोग्य शिबिरासाठी पंढरपूरच्या 65 एकर क्षेत्रात आरोग्य मंडप उभारण्यात आला आहे.  या शिबिरासाठी जवळपास 2 हजार डॉक्टरांच्या आणि 5 हजार स्वयंसेवक शिवसैनिकांच्या मदतीने 11 लाख रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. सोनोग्राफी एक्सरे, हृदयरोग तपासणी, शुगर तपासणी आदी तपासणी मोफत केली जाणार आहे.