Kartiki Ekadashi 2023 : बोंबल्या विठोबाच्या दर्शनासाठी कोकणात गर्दी, असे नाव पडण्यामागे काय आहे आख्यायिका?

| Updated on: Nov 23, 2023 | 1:36 PM

एकादशीच्या निमित्त्याने अशा अनेक ठिकाणी जत्रा भरवण्यात येते. असेच अे ठिकाण कोकणातही आहे. कोकणातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या ताकई विठ्ठल मंदीरात कार्तिकेय एकादशी पासून पारंपारिक यात्रेला सुरवात होते. या यात्रेत कोट्यावधी रूपयांची उलाढाल होते हे विशेष.

Kartiki Ekadashi 2023 : बोंबल्या विठोबाच्या दर्शनासाठी कोकणात गर्दी, असे नाव पडण्यामागे काय आहे आख्यायिका?
थाकती पंठरी ताकई
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई :  आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi 2023) आहे. लाखोंच्या संख्येने भाविक पंठरपूरात दाखल झालेले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी विठूरायाचे दर्शन झाले होते अशी आख्यायीका आहे. एकादशीच्या निमित्त्याने अशा अनेक ठिकाणी जत्रा भरवण्यात येते. असेच अे ठिकाण कोकणातही आहे. कोकणातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या ताकई विठ्ठल मंदीरात कार्तिकेय एकादशी पासून पारंपारिक यात्रेला सुरवात होते.  लाखोंच्या संख्येनं कोकणातील भाविक या ठिकाणी दर्शनास येत असतात. या मंदिराचे नाव बोंबल्या विठोबा आहे. असे विचित्र नाव पडण्यामागे कारणही तसेच आहे. जाणून घेऊया यामागची आख्यायीका.

तीनशे पंन्नास वर्षांची परंपरा

कोकणातील या ताकई विठ्ठल मंदीराच्या यात्रेला ३५० वर्षांची परंपरा आहे. संत तुकाराम महाराज हे याच ठिकाणी येऊन मिर्चीचा व्यापार करत होते. अनेक वर्षापासून त्यांची इथे ऊधारी शिल्लक असल्याने ती वसूल न झाल्याने त्यांनी विठ्ठलाकडे धाव घेतली. यानंतर स्वतः विठ्ठल इथे प्रकट झाले आणि त्यांनी इथे बोंब मारल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून या जागेला बोंबल्या विठोबा असे नाव पडले.

कालांतराने इथला मिर्चीचा व्यापार तर लोप पावला पण इतर बाजारपेठ वाढली आणि आज इथला बैल, मासळी , घोंगडी , बाजार तसेच जलेबी जगप्रसिद्ध झाली. आणि आजही खालापूर, खोपोली आणि आसपासच्या परिसरातील सर्व निवासी या जत्रेला हजेरी लावतात.

हे सुद्धा वाचा

ताकई येथील बोंबल्या विठ्ठल

दरवर्षी यात्रेत होते कोट्ट्यावधींची उलाढाल

बैल, मासळी , घोंगडी , बाजार यांचा मोठ्या प्रमाणात येथे व्यावसाय करण्यात येतो. दूरवरून व्यापारी या यात्रेसाठी येतात. या यात्रेत मोठ्याप्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. कोकणातील प्रसिद्ध असलेल्या या यात्रेत कोट्यावधींचा व्यावसाय केला जातो. शेकडो कुटूंबीयांचा यामुळे उदरनिर्वाह होत असतो. वेगवेळ्या प्रकारच्या व्यावसायाचे फिरते प्रतिष्ठान लागल्याने लोकांची गर्दी पाहायला मिळते. कोरोना काळात ही यात्रा बंद होती त्यामुळे दोन वर्ष ही यात्रा भरवण्यात नाही आली. मागच्या वर्षीपासून ही यात्रा पून्हा सुरू करण्यात आली. या यात्रेला स्थानिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.