घरात या ५ गोष्टी ठेवणे मानले जाते शुभ, आयुष्यभर संकटांपासून रहाल दूर

| Updated on: Nov 18, 2024 | 1:17 PM

कमावलेले पैसे घरात फार काळ टिकत नाहीत. वास्तुनुसार घरात असलेले वास्तुदोष पैशाशी संबंधित समस्यांचे कारण ठरू शकतात. घरात वास्तूशी संबंधित कोणताही दोष असेल तर अनेक प्रयत्नांनंतरही लोकांना मेहनतीचे पूर्ण फळ मिळत नाही.

घरात या ५ गोष्टी ठेवणे मानले जाते शुभ, आयुष्यभर संकटांपासून रहाल दूर
घरात या ५ गोष्टी ठेवणे मानले जाते शुभ
Image Credit source: social media
Follow us on

आजच्या घडीला आपल्या दैनंदिन जीवनात वाढणाऱ्या गरजा तसेच मुलांचे शिक्षण या सर्व गोष्टी लक्षात घेता पैसा आयुष्यात खूप महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे प्रत्येकाला जास्त पैसे कमवण्याची आवश्यकता असते कारण पैशाशिवाय कोणतेही काम होत नाही. पैसे कमावण्यासाठी लोकं खूप मेहनत घेतात, पण अनेकदा मेहनत करूनही यश मिळत नाही. याशिवाय कमावलेले पैसे घरात फार काळ टिकत नाहीत. वास्तुनुसार घरात असलेले वास्तुदोष पैशाशी संबंधित समस्यांचे कारण ठरू शकतात. घरात वास्तूशी संबंधित कोणताही दोष असेल तर अनेक प्रयत्नांनंतरही लोकांना मेहनतीचे पूर्ण फळ मिळत नाही.

वास्तुशास्त्रानुसार ज्या घरांमध्ये नकारात्मक शक्तींचे अधिक प्राबल्य असते त्या घरांमध्ये पैसा आणि सुख मिळण्याच्या मार्गात विविध अडथळे येत असतात. वास्तुशास्त्रात जीवनात धनलाभ आणि सुख मिळवण्यासाठी असे ५ उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने घरात सुख-समृद्धी आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते.

देव्हाऱ्यात अखंड नारळ ठेवणे

आपल्या देव्हाऱ्यात अखंड नारळ ठेवणे अत्यंत पवित्र आणि देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. मान्यतेनुसार जिथे अखंड नारळ असतो तेथे वास्तुदोष नसतो आणि देवी लक्ष्मीची कृपा नेहमी घरात राहते आणि जीवनात कधीही आर्थिक संकटे येत नाहीत.

गणेशाची मूर्ती

हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय स्थान दिले आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरूवात गणपतीची पूजा करून केली जाते. तसेच गणपतीला प्रथम पूज्य देवता आणि अडथळा दूर करणारे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरातील दोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती अवश्य ठेवावी. श्रीगणेश धन आणि सुखातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करतात.

देवी लक्ष्मी आणि कुबेर यांचा फोटो

देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना संपत्तीचे सुख देणारे आणि चांगले उत्पन्न देणारे देवता मानले जाते. अशा वेळी घरात देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे फोटो असणे आवश्यक आहे. धनवृद्धीसाठी घरात लक्ष्मीमातेचा फोटो असावा आणि नियमित पूजा करावी.

बासरी

वास्तुशास्त्रानुसार घरातील सर्व प्रकारचे वास्तुसंबंधित दोष दूर करण्यासाठी बासरी अतिशय प्रभावी मार्ग मानला जातो. बासरी हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे. अशावेळी आर्थिक अडचणींपासून सुटका मिळवण्यासाठी घरात बासरी ठेवणे आवश्यक आहे. असे केल्याने घरात देवी लक्ष्मीचा वास होतो. तसेच देव्हाऱ्यात बासरी ठेवल्यास शिक्षण, व्यवसाय व नोकरीतील अडथळे दूर होऊन सुख-समृद्धी व धनप्राप्ती होते.

घरात शंख ठेवा

शंखामध्ये वास्तुदोष दूर करण्याची अत्यंत अद्भुत क्षमता असते. ज्या घरात शंख नियमित पणे वाजवला जातो, तिथे आजूबाजूला सकारात्मकता असते. शंख देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्याने घरामध्ये देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. तसेच घरात शंख असल्यास वास्तुदोष उद्भवत नाहीत आणि पैशाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)