ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींच्या हातात वेगवेगळी रत्न असलेली अंगठ्या पाहायला मिळतात. एखाद्या ग्रहाचा वाईट प्रभाव कमी होण्यासाठी हे सूचवलं जातं. ज्योतिषशास्त्रात रत्नाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. कारण प्रत्येक रत्नात एक वेगळी ऊर्जा आणि शक्ती असते. अनेकदा संबंधित रत्न परिधान केलं की काम पटपट होतात. याचाच अर्थ असा की संबंधित रत्न हे सूट झालं आहे. पण कोणतंही रत्न परिधान करू नये. रत्न परिधान करण्यापूर्वी ग्रह आणि राशींचा अभ्यास असलेल्या व्यक्तीकडून सल्लामसलत करावी. नाही तर असच रत्न परिधान केलं तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं. जर एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त रत्न परिधान करत असेल तर विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण काही ग्रहांचा एकमेकांशी पटत नाही. त्यामुळे वाईट परिणाम सोसावे लागू शकतात. सर्वात पहिलं म्हणजे रत्न सूचवल्यानंतर ते आपल्याला सूट होते की नाही याचं परीक्षण करावं.
ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व प्रथम संबंधित रत्न तीन दिवस आपल्या उशीखाली ठेवून झोपावं. जर या कालावधीत तुम्हाला काही वाईट स्वप्न वगैरे पडली नाहीत किंवा काही अपघात झाला नाही तर सदर रत्न तुम्हाला काहीच नुकसान करणार नाही, असं समजावं. तसेच या कालावधीत काही किचकट पटापट होऊ लागली तर रत्नाचे चांगले परिणाम समजावे. ज्योतिषशास्त्रानुसार, रत्न परिधान करताना त्याचं वजनही तितकंच महत्त्वाचं आहे. संबंधित रत्न किती वजनाचं आहे यावर बरंच काही अवलंबून असतं. रत्न किमान अर्ध्या रत्तीच्या वर असावं.
रत्न परिधान करताना शुभ मुहूर्त लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणतंही रत्न परिधान करण्यापूर्वी त्याची पूजा करणं गरजेचं आहे. खासकरून शुक्ल पक्षात रत्न परिधान करावं. इतकंच काय संबंधित ग्रहाचा व्होरा त्या दिवसात कधी आहे ते पाहावं. त्या व्होऱ्यात संबंधित ग्रहाचा जप करावा. इष्ट देवतेच्या चरणाला स्पर्श करून धारण करू शकता. त्याचबरोबर मढवून आणलेली रत्नाची अंगठी दुधात टाकून ठेवा. त्यानंतर शुद्ध पाण्याने स्वच्छ करा आणि एका छोटसं हवन करा. ही अंगठी हवनावर सातवेळा फिरवा. त्यानंतर ती संबंधित बोटात धारण करा. हा विधी करून अंगठी सिद्ध करावी, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.