मुंबई : कोरोना (Corona) काळातील निर्बंधांमुळे मागील दोन वर्षात कोणलाच लग्न (vivah) करता आले नाही. पण आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने लग्नसमारंभासारखे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. 2022 हे वर्ष अनेक अर्थांनी लाभदायक असणार आहे. या वर्षात एकाच महिन्यात सर्व ग्रह आपली रास बदलणार आहेत तर चातुर्मास वगळता या वर्षात विवाहाचे अनेक मुहूर्त असणार आहेत. हिंदू धर्मात (Hindu) कोणतेही काम करण्यासाठी शुभ वेळ पाहिली जाते. लग्नासारख्या अत्यंत महत्त्वाच्या समारंभासाठी सर्वोत्तम मुहूर्त काढणे महत्त्वाचे मानले जाते. 2022 मध्ये तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर हे काही शुभ मुहूर्त फक्त तुमच्यासाठी.
ज्योतिष शास्त्रानुसार लग्नासाठी सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे वार निवडण् खूप फायद्याचे ठरते. मंगळवार हा विवाहासाठी चांगला दिवस मानला जात नाही. याशिवाय द्वितीया तिथी, तृतीया तिथी, पंचमी तिथी, सप्तमी तिथी, एकादशी तिथी, त्रयोदशी तिथी या शुभ आणि उत्तम मानल्या जातात, तर चतुर्थी, नवमी, चतुर्दशी तिथी विवाहासाठी शुभ मानली जात नाहीत.
लग्नाची शुभ तारीख निवडताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, चातुर्मासात भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रामध्ये सागरात जातात तेव्हा विवाह आणि कोणतेही शुभ कार्य करता येत नाही.
Zodiac | सूर्य बदलणार त्याची रास, या राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, भरपूर पैसा आणि मान सन्मान मिळणार
Chanakya Niti | आयुष्यात आनंदी राहायचंय? तर या लोकांपासून चार हात लांबच राहा
आज होणार देवीच्या ‘कुष्मांडा’ अवताराचा जागर, जाणून घ्या पूजेची वेळ आणि सर्व काही एका क्लिकवर