Marriage on Akshaya Tritiya 2022: “अक्षय तृतीयेच्या मुहर्तावरलग्न करण्यासाठी का आहे खास! घ्या जाणून

| Updated on: May 03, 2022 | 9:00 AM

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक मुहूर्त असतात. या दिवशी लग्नालाही खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी स्वयंसिद्ध मुहूर्त असतो. त्यामुळे शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य पंचाग न पाहता करता येते.

Marriage on Akshaya Tritiya 2022: अक्षय तृतीयेच्या मुहर्तावरलग्न करण्यासाठी का आहे खास! घ्या जाणून
Image Credit source: TV9
Follow us on

वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा व खास मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya)महत्त्व आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार  वर्षातील दुसरा मराठी महिना(Marathi Month) वैशाखातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. या दिवशी कार्य करणे शुभ मानले जाते. खासकरून लग्न सोहळे (Wedding ceremonies) याच दिवशी करण्याचा वधू-वर पित्यांचा मानस असतो. या दिवशी सगळीकडे लग्नाची धूम असते. लग्नासाठी ज्या लोकांचे ग्रह आणि नक्षत्र जुळत नाहीत किंवा मुहूर्त निघू शकत नाहीत, त्यांना या शुभ मुहर्तावर लग्न करताना दिसून येतात. या दिवशी कोणत्याही प्रकाराच्या अडथळ्याशिवाय ते लग्न करू शकतात.

या दिवशी विवाह पार पडतात

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक मुहूर्त असतात. या दिवशी लग्नालाही खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी स्वयंसिद्ध मुहूर्त असतो. त्यामुळे शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य पंचाग न पाहता करता येते. जे निश्चितच यशस्वी होते. हिंदू धर्मात विवाहाचा सात जन्मांशी संबंधित जोडला जातो. अग्नीच्या सात फेऱ्या मारून दोन जीवांचे मिलन होते. अक्षय्य तृतीयेचा दिवस अतिशय शुभ असून या दिवशी जे काही कार्य केले जाते ते निश्चितच सफल होते. असेही म्हटले जाते. म्हणूनच अनेक विवाह अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केले जातात. . जेणेकरून वैवाहिक आयुष्यात कोणत्याही अडथळ्याशिवाय सहजीवन जगू शकतात.

५० वर्षानंतर योग

यंदा अक्षय्य तृतीया मंगल रोहिणी नक्षत्राच्या शोभ योगमध्ये साजरी केली जात आहे. असा शुभ योग अक्षय्य तृतीयेला ३० वर्षानंतर येत आहेत. तर ५० वर्षानंतर या दिवशी ग्रहांची स्थितीही खास असणार आहे. अक्षय्य तृतीयेला चंद्रमा आपली उच्च राशी वृषभमध्ये आणि शुक्र आपली उच्च राशी मीनमध्ये असणार आहे. याशिवाय शनी आपली राशी कुंभमध्ये आणि देवगुरू गुरू आपलीच राशीमीनमध्ये असणार आहे.

हे सुद्धा वाचा