ड्रॉईंग रूममधील या चुकांमुळे होईल संपत्तीची हानी, चुका सुधारा नाहीतर पश्चाताप नक्की!
ड्रॉईंग रूम बनवताना आणि सजवताना वास्तूचे नियम लक्षात ठेवा. चला जाणून घेऊया की वास्तुनुसार ड्रॉईंग रूम सजवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल.
‘पितृदोष’ आणि ‘वास्तुदोष’ दूर करण्यासाठी कापूर वापरून करा हे उपाय
Image Credit source: TV9
Follow us on
मुंबई : ड्रॉईंग रूम( Drawing Room) ही अशी एक जागा जीथे घरातील सदस्यच नाही तर पाहुणे देखील येतात. वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही या खोलीला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही घरातील ड्रॉईंग रूम हे त्या घराचे सौंदर्य असते. म्हणून प्रत्येकजण आपल्या घरातील ड्रॉईंग रुम मोठ्या उत्साहाने सजवतो. परंतु या सजावटीमध्ये आपण अनेकदा त्या वास्तू नियमांकडे दुर्लक्ष करतो. त्याचा आपल्या कुटुंबियांवर तसेच घरात येणाऱ्या पाहुणे मंडळींच्या संबंधांवर वाईट परिणाम होतो. ड्रॉईंग रूम हे घरातील महत्त्वाचे स्थान आहे. हे पाहुण्याला घराच्या मालकाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते, म्हणून ते योग्य ठिकाणी असणे खूप महत्वाचे आहे.
वास्तूशासनुसार जेव्हा तुम्ही ड्रॉईंग रूममध्ये समोरच्या भिंतीवर तुमच्या कुटुंबाचे फोटे लावा ही गोष्ट शुभ मानली जाते.या फोटोसाठी लाल फ्रेम वापरावी
ड्रॉईंग रूममध्ये फॅमिली फोटो प्रमाणेच तुम्ही हंसाचा फोटो भिंतीवर देखील लावू शकता.
वास्तूनुसार ड्रॉईंग रूममध्ये टीव्ही नेहमी आग्नेय कोनात ठेवावा. टीव्ही कधीही ईशान्य किंवा आग्नेय दिशेला ठेवू नये. त्याचप्रमाणे टेलिफोन देखील आग्नेय कोनात किंवा पूर्व दिशेला ठेवावा. आग्नेय कोनात म्युझिक सिस्टीम सारख्या मनोरंजनाच्या वस्तू असणे देखील शुभ आहे.
वास्तूशास्त्राच्या नियमांनुसार, कूलर नेहमी पश्चिम दिशेला ठेवावा. वास्तूनुसार ड्रॉईंग रूममधील एसी पश्चिम कोनात आणि हिटर आग्नेय कोनात असावा.
ड्रॉईंग रूममध्ये गडद रंगाने रंगरंगोटी करणे नेहमीच टाळावे, कारण हे रंग तुम्हाला काही दिवस चांगले दिसू शकतात, परंतु काही काळानंतर ते तुम्हाला नाउमेद करू लागतात.
ड्रॉईंग रूममध्ये सोफा, दिवाण, शोकेस इत्यादी वस्तू नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवा.
ड्रॉईंग रूममध्ये टीव्ही, म्युझिक सिस्टीम यांसारख्या मनोरंजनाच्या वस्तू नेहमी आग्नेय दिशेला ठेवाव्यात.
ड्रॉईंग रूममध्ये फिश पॉट ठेवणे शुभ मानले जाते. फिश पॉट दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवा आणि त्यात सोनेरी रंगाचा मासा ठेवा. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)