हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्वाचं स्थान आहे. प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीचे रोप असतं, त्याशिवाय आपले घराबाहेरील अंगण पूर्ण होत नाही. तुळशीचे असंख्य फायदे आहेत. तर धार्मिक शास्त्रांमध्ये तुळशीला अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर तुळशी मातेला भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता दोघेही प्रिय आहेत म्हणून तुळशीला हरिप्रिया असेही म्हणतात.तुळशीची नियमित पूजा केल्याने व्यक्तीला अनेक लाभ मिळतात. मात्र अनेकांच्या दारातील तुळस वारंवार कोमेजून जात असेल किंवा बराच काळ योग्य स्थितीत राहत नसेल तर धार्मिक दृष्टीकोनातून हे एखाद्या गोष्टीचे लक्षण असू शकते. अशावेळी जाणून घेऊया जर तुमच्या घरातील तुळस पुन्हा पुन्हा सुकून जाते तर ते काय दर्शवते. तसेच तुळस हिरवी कशी ठेवावी हे तुम्हाला कळेल.
तुळशीचे रोपं सुकत असल्यास काय दर्शवते?
दारातील तुळशीला तुम्ही वारंवार पाणी देऊन सुद्धा तुळशीचे रोपं सुकून जात असेल. तसेच रोज पूजा करून देखील रोपं कोमेजत असेल तर ते घरात काही तरी समस्या येत असल्याचं संकेत दर्शवतात.
तुळशीच्या रोपाची घ्यायाची काळजी
तुळशीचे रोप आपल्या सर्वांसाठी खूप गुणकारी मानली जाते. म्हणून तुळशीला कधीही आदल्या दिवशी भरून ठेवलेलं पाणी अर्पण करू नये. तसेच तुळशीला नेहमी ताजे फुल अर्पण करावे. यामुळे तुळस छान टवटवीत राहते.
अशुद्ध अवस्थेत तुळशीला हात लावू नका
तुमच्या घरातली तुळशीला कधीही बाहेरून आल्यावर हात लावून नये. तसेच घरातील व्यक्ती जेव्हा कोणत्या अंत्यविधी वरून आल्यावर सुद्धा तुळशीच्या रोपाला हात लावू नये याची काळजी घ्यावी. याशिवाय तुळशीच्या आसपास कोणतेही कपडे वाळत घालू नये. आज आपल्यातले प्रत्येकजण सकाळी उठल्यावर तुळशीची पूजा करत असताना दिवा व अगरबत्ती लावतात. पण असे न करता फक्त दररोज संध्याकाळी दीपदान करावे.
तुळसचे रोपं सुकण्यापासून कसे रोखायचे?
तुळस नेहमी आपल्या अंगणात लावली जाते कारण तुळस नेहमी आपल्या घराकडे पाहते, त्यामुळे एखादी समस्या येणार असल्यास तुळशीचे रोपं सगळ्यात वाळते. तसेच तुळशीच्या मुळाशी हळद आणि गंगाजल टाकल्यास तुळस खराब होत नाही, असेही मानले जाते. तुळशीच्या रोपांना थंड वारा आणि सूर्यप्रकाश नसलेल्या ठिकाणी ठेवावे. हिवाळ्याच्या ऋतूत ही तुळशीच्या रोपाला एखाद्या स्वच्छ कापडाने झाकून ठेवावी. थंडीच्या दिवसात तुळशीच्या रोपांना भरपूर प्रमाणात अधिक मंजिरी येत असते. त्यामुळे मंजिरी वेळोवेळी काढून टाकल्याने तुळशीचे रोप हिरवेगार टवटवीत राहते.