Surya Grahan 2024 : पुन्हा अंधार ? वर्षातल्या दुसऱ्या सूर्यग्रहणाचे मोठे अपडेट काय ?

| Updated on: May 23, 2024 | 2:14 PM

या वर्षातील दुसऱ्या सूर्यग्रहणाबाबात लोकांच्या मनात अनेक शंका, प्रश्न आहेत. हे सूर्यग्रहण कधी, कोणत्या तारखेला आहे, हे ग्रहण यावेळी सर्वांना दिसणार की नाही ? असे अनेक सवाल लोकांच्या मनात आहेत. याबद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हे नक्की वाचा.

Surya Grahan 2024 : पुन्हा अंधार ? वर्षातल्या दुसऱ्या सूर्यग्रहणाचे मोठे अपडेट काय  ?
Follow us on

हिंदू धर्मात सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व आहे. सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे ज्यामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे किंवा अंशतः झाकतो, ज्यामुळे पृथ्वीवरील सूर्यप्रकाश काही काळासाठी कमी होतो किंवा पूर्णपणे अदृश्य होतो. साधारणत: वर्षभरात एकच सूर्यग्रहण होते, पण या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये दुसऱ्यांदा सूर्यग्रहण होणार आहे. 8 एप्रिल 2024 रोजी या वर्षातील पहिले सूर्यग्रहण झाले. त्या सूर्यग्रहाणाचा विशेष प्रभाव अमेरिका आणि आसपासच्या देशांमध्ये दिसून आला. या ग्रहणाची खास गोष्ट म्हणजे हे ग्रहण यावेळी भारतात दिसले नाही. त्यामुळेच पुढच्या सूर्यग्रहणाबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. हे सूर्यग्रहण कधी, कोणत्या तारखेला आहे, हे ग्रहण यावेळी सर्वांना दिसणार की नाही ? असे अनेक सवाल लोकांच्या मनात आहेत. या वर्षातील दुसऱ्या सूर्यग्रहणासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कोणत्या तिथीला आहे सूर्यग्रहण ?

यावर्षीचं दुसरं सूर्यग्रहण हे अश्विन महिन्यातील अमावस्येच्या तिथीला असेल. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, 2 ऑक्टोबर 2024 या दिवशी वर्षातील दुसरं सूर्यग्रहण लागणार आहे. या दिवशी सूर्य ग्रहण रात्री 9 वाजून 13 मिनिटांनी सुरू होणार असून ते 3 वाजून 17 मिनिटांनी समाप्त होईल. या ग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे 6 तास 4 मिनिटे इतका असेल.

ग्रहण भारतात दिसेल की नाही ?

यावर्षीचं एप्रिल महिन्यातील पहिलं ग्रहण हे भारतात दिसलं नव्हतं. हैराण करणारी गोष्ट म्हणजे यावर्षीचं दुसरं सूर्यग्रहणदेखील भारतात दिसणार नाहीये. याचं मुख्य कारण म्हणजे भारतीय वेळेनुसार, हे ग्रहण रात्रीच्या वेळेस लागणार आहे.

कुठे दिसणार सूर्यग्रहण ?

भारतात नव्हे तर जगातील कोणत्या देशात हे सूर्यग्रहण दिसेल असा सवाल लोकांना सतावत आहे. ब्राझील, कूक आयलंड, चिली, पेरू, होनोलूलू, अंटार्क्टिका, अर्जेंटीना, मेक्सिको, न्यूझीलंड, आर्क्टिक, फिजी, उरुग्वे, ब्यूनस आयर्स आणि बेका बेका आइलैंड आदि देशों के लोग इस सूर्य ग्रहण को देख सकते हैं।

सूर्यग्रहणाचा सुतक काळ

जेव्हा सूर्यग्रहण होते त्याला सुतक काळ म्हणतात. हे ग्रहणाच्या प्रकारावर आणि धार्मिक मान्यतांवर अवलंबून असते. शास्त्रानुसार सुतक कालावधी सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतो. यावेळी हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सुतक कालावधी वैध राहणार नाही. जेव्हा सुतक कालावधी सुरू होतो त्यामुळे शुभ आणि मंगल कार्य केली जात नाहीत. या काळात लोक पूजा करणे देखील टाळतात. सुतक ग्रहण संपल्यानंतर गंगाजलाने पवित्र केल्यानंतरच मंदिराचे दरवाजे उघडले जातात.