मुंबई, यावर्षी शरद पौर्णिमा 9 ऑक्टोबर, रविवारी म्हणजेच उद्या येत आहे. पौर्णिमा हे शरद ऋतूच्या आगमनाचे संकेत आहे. अश्विन महिन्यातील या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2022) असेही म्हणतात. शरद पौर्णिमेची रात्र विशेष असते. या रात्री चंद्राचा प्रकाश खूप महत्वाचा मानला जातो. असे म्हटले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात असे काही घटक असतात, जे आपले शरीर आणि मन शुद्ध करतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. वास्तविक, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो, त्यामुळे चंद्राचा प्रकाश आणि त्यात असलेल्या घटकांचा पृथ्वीवर थेट आणि सकारात्मक परिणाम होतो.
जोतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाशी संबंधित घटक आहेत. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा त्याचा आपल्या मनावर अधिक परिणाम होतो. जे मानसिकरित्या अस्वस्थ आहेत, जे डिप्रेशनमध्ये राहतात, ज्यांना सतत भय वाटते त्यांच्यासाठी शरद पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात काही विशेष उपाय केल्याने तुम्ही या सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकता.
ज्यांच्या वैवाहिक जीवनात कटुता आली आहे त्यांनी या दिवशी काही उपाय केल्यास जोडीदारासोबतचे नटे सुधारण्यास मदत होऊ शकते. यासाठी चांदीची मोत्याची अंगठी चंद्राच्या ‘ओम श्रम श्रीं श्रोण सह: चंद्रमसे नमः’ 108 वेळा मंत्रजाप करून अभिमंत्रित करा.
अशा रीतीने मंत्राने अंगठीला उर्जा दिल्यानंतर ती एका वाडग्यात ठेवा आणि ती चंद्राच्या प्रकाशात रात्रभर ठेवा. दुसर्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून उजव्या हाताच्या करंगळीत घाला. या उपायाने वैवाहिक जीवनातल्या बाधा दूर होतील.
जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित निर्णय घेता येत नसतील किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर शरद पौर्णिमेच्या संध्याकाळी भगवान विष्णूसमोर तुपाचा दिवा लावा. तसेच त्यांच्यापुढे हात जोडून नतमस्तक व्हा आणि काही वेळ ध्यानाच्या मुद्रेत बसा. व्यवसायात यश मिळण्यासाठी आशीर्वाद मागा.